‘बिग बॉस मराठी’च्या घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट, प्रेक्षक भावुक म्हणाले, आमच्यासाठी तूच

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट, प्रेक्षक भावुक म्हणाले, आमच्यासाठी तूच

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi ४)चा यंदा चौथा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसच्या घरात सदस्यांना दाखल होऊन ५० दिवस उलटले आहेत. आता हा शो रंजक वळणावर आला आहे. घराघरात दररोज नवीन वाद, भांडणं, मैत्री आणि रुसवे फुगवे पाहायला मिळतात. दरम्यान आता बिग बॉसच्या घरात ४ चॅलेंजर्स आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची खेळातील उत्सुकता जास्त वाढली आहे. मात्र आज घरातील एक स्पर्धक बिग बॉसच्या आदेशावरून घराबाहेर जाणार आहे.

हेही वाचा : 

The Kashmir Files चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, तर दुसरीकडे अनुपम खेर सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य भावूक झाले आहेत. तेजस्विनीला घर सोडावं लागणार असल्याने घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत. तेजस्विनीच्या हाताला दुखापत झाल्याने तिला घर सोडून जाणे अपिरिहार्य असल्याचे यामुळे समोर आले आहे. तेजस्विनीची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर बिग बॉसने निर्णय दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताच्या दुखापतीमुळे तेजस्विनीला पुढील खेळ खेळणे सोयीचे नसल्याने तिला बिग बॉसच्या घरातून तिला निरोप घ्यावा लागला आहे. ‘बिग बॉस’च्या येणाऱ्या भागात तेजस्विनी घरातून बाहेर पडणार आहे.

प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत (Bigg Boss Marathi) आहेत,”तेजस्विनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे घर आपल्याला आता या क्षणी सोडावे लागेल”. बिग बॉसच्या या बोलण्यानंतर घरात सर्वत्र शांतता पसरली आहे. किरण माने, अपूर्वा, अमृता धोंगडे या सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

‘या कोणत्याही कटात मनसे नेत्याचा सहभाग नव्हता’, जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटची पुन्हा चर्चा

तेजस्विनी लोणारीचा (Tejaswini Lonari) मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉसच्या घरात ५० दिवसांचा प्रवास पूर्ण केल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनेदेखील तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या होत्या. तेजस्विनीला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार असल्याने चाहते मात्र नाराज झाले आहेत. हे खूपच धक्कादायक आहे, आमच्यासाठी तूच विजेती आहेस, बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची जान गेली, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

मुंबई महानगर पालिकेत राज ठाकरेंचं वन मॅन शो !

Exit mobile version