‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा समोर आलं भुवनेश्वरीच सत्य

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे,दरम्यान मालिका प्रेमी असणारे प्रेक्षक हे नेहमीच आवडत्या मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार यासाठी उस्तुक असतात.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा समोर आलं भुवनेश्वरीच सत्य

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे,दरम्यान मालिका प्रेमी असणारे प्रेक्षक हे नेहमीच आवडत्या मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार यासाठी उस्तुक असतात.अशातच आता टेलिव्हिजनवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.प्रेक्षक या मालिकेवर आणि मालिकेतील कलाकारांवर भरभरुन प्रेम करतात.कमी वेळातच या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे.मालिकेतील भुवनेश्वरीचा दरारा असो किंवा अक्षराचा साधा स्वभाव प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत.

दरम्यान अक्षरा-अधिपतीच्या लग्नानंतर भुवनेश्वरीने अक्षराला त्रास देण्यासाठी अनेक कारस्थान केलं आहे.अक्षराने घरात आल्यापासून अनेक सुधारणा केल्यात.तिच्या सासऱ्यांची तब्येत देखील ठीक केलेली असते.आणि त्यामुळे अक्षराला आता भुवनेश्वरीचा खरा चेहरा त्यांना सांगितलेला असतो.दरम्यान आता अक्षरा आणि अधिपतीमध्ये देखील झालेले वाद आपण मागच्या आठवड्यात पाहिले होते, अधिपती अक्षरावर हात देखील उचलतो.अशे अनेक रंजक वळण आपण मालिकेत पाहिले आहे.तर आता देखील मालिकेत ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.आणि मालिका म्हंटलं तर ट्विस्ट हे पाहायला मिळणारचं आहेत.

अक्षरा आणि भुवनेश्वरी मधलं नातं एक वेगळं वळण घेताना दिसणार आहे. अक्षराने पुनः शाळेत जायला सुरवात केली आहे हे भुवनेश्वरीला बिलकूल आवडलेलं नाही. अक्षराच्या शाळेच्या पहिल्या दिवशीच भुवनेश्वरी फुलपगारे सरांना फोन करुन सांगते की अक्षराला जर  शाळेत घेतलंत तर तुमचा तो शाळेत शेवटचा दिवस असेल.दरम्यान त्यावेळी अक्षरा शाळेत जाऊन फुलपगारे सरांना जाऊन सांगते की,माझ्या शाळेत येण्याने तुम्हाला कोणी शाळेतून काढून ठाकणार नाही.त्यामुळे तुम्ही काळजी करु नका.तर आताअक्षरा भुवनेश्वरीचा हा डाव तिच्यावरच उलटवणार का? फुलपगारेसरांची नोकरी वाचणार का? भुवनेश्वरीला सतत होणारी तिची हार आता सहन होत नाहीये. तेव्हा ती अक्षराच्या बहिणीला म्हणजेच इराला आपल्या सोबत घेतेय. ह्याच बरोबर भुवनेश्वरी, चारुहासने जो भूतकाळ उलगडला त्यामध्ये तिची काय बाजू आहे हे स्वत:हून अक्षरासमोर व्यक्त करते. आता भुवनेश्वरीच हे सत्य खरं आहे की कोणतं नवीन नाटक? हे येणाऱ्या भागातच कळेल.

हे ही वाचा:

Anjali Damania यांच्या दाव्यावर Chhagan Bhujbal म्हणाले…

मोठी बातमी!, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version