थलपथी विजयचा चित्रपट वारिसू झाला लीक, या साइट्सवरून करता येतोय डाउनलोड

हा चित्रपट एक भावनिक कौटुंबिक नाटक आहे ज्यामध्ये भरपूर अॅक्शन आहे. वामशी पडाई पिल्ली दिग्दर्शित, या चित्रपटात विजय आणि रश्मिका मानधना मुख्य भूमिकेत आहेत.

थलपथी विजयचा चित्रपट वारिसू झाला लीक, या साइट्सवरून करता येतोय डाउनलोड

साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय पुन्हा एकदा धमाकेदार पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. वामशी पैडिपल्ली दिग्दर्शित हा चित्रपट आज ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वीच लीक झाला असला तरी, या चित्रपटात विजय पुन्हा एकदा जुन्या स्टाईलमध्ये त्याच्या चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे. हा चित्रपट एक भावनिक कौटुंबिक नाटक आहे ज्यामध्ये भरपूर अॅक्शन आहे. वामशी पडाई पिल्ली दिग्दर्शित, या चित्रपटात विजय आणि रश्मिका मानधना मुख्य भूमिकेत आहेत.

या चित्रपटात प्रकाश राज हे खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहेत ज्याचे विजयसोबत वैर आहे. तुम्हाला चित्रपटातील रोमान्ससह अॅक्शन थ्रिलरचा जबरदस्त तडका पाहायला मिळेल. चित्रपटातील थलपथी विजयची डायलॉग डिलिव्हरी प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. पण रिलीजनंतर लगेचच विजयचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट विविध पायरेटेड साईट्सवर लीक झाला आहे.

थळापाथी विजयचा चित्रपट Varisu Tamilyogi, Tamilrockers, Tamilblasters या साईटसवर आणि त्याचबरोबर Moviesda, Filmyzilla, Kuttymovies, Tamil Yogi, Mp4moviez वर लीक झाला आहे. इतकाच नव्हे तर या सर्व साईट्सवर लीक झालेला हा चित्रपट अगदी एचडी रिसोल्युशनमध्ये लीक झाला आहे. चित्रपट प्रॉडक्शन हाऊस या सर्व साइटवर कायदेशीर कारवाई करू शकते.

थलपथी विजयचा ‘वारीसु’ हा चित्रपट केवळ तामिळमध्येच नाही तर विविध भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांची क्रेझ पाहून निर्माते हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करत आहेत. थलपथी विजयच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी अर्जुन कपूरच्या अडचणी वाढू शकतात. १३ जानेवारी २०२३ रोजी, जिथे आधी फक्त अर्जुन कपूर आणि तब्बू स्टारर चित्रपट ‘कुत्ते’ हिंदीमध्ये रिलीज होत होता, आता तो मोठ्या पडद्यावर दक्षिण स्टार विजय आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘कुत्ते’ या चित्रपटाशी स्पर्धा करत आहे. पण आता चित्रपट लीक झाल्यामुळे त्याचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कॉलेक्शनवर काही परिणाम होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

न्यूझीलंड क्रिकेटसंघात पसरली शोककळा, ‘या’ दिग्गज खेळाडूने जगाचा निरोप घेतला

‘गांधी-गोडसे एक युद्ध’चा ट्रेलर रिलीज, या दिवशी चित्रपट होणार थिएटरमध्ये दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version