spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raja Hindustani चित्रपटासाठी सुपरस्टार आमिर खानसोबत अभिनेत्रीने तिच्या आईसमोरच शूट केला किसिंग सीन; घ्यावे लागले होते ४७ रिटेक

Raja Hindustani : अनेक दिग्गज अभिनेत्रींसह अभिनेत्री करिश्मा कपूरनेही ९० चे दशक चांगलेच गाजवले आहे. करिश्माने तिच्या अभिनय शैलीने सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेऊन बरेच सुपरहिट चित्रपट दिले. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘राजा हिंदुस्थानी’ (Raja Hindustani). हा चित्रपट जितका लोकप्रिय आहे तितकीच यातील गाणीही लोकप्रिय आहेत जी आजही आवर्जून ऐकली जातात. राजा हिंदुस्थानी चित्रपटातली करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि अमीर खानच्या (Aamir Khan) जबदस्त केमिस्ट्रीची चर्चा रंगलेली.

या चित्रपटातील अमीर आणि करिश्माची ऑन-स्क्रीन रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरली. चित्रपटाच्या कथानकामुळे आणि त्यांच्या केमिस्ट्रीमुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. पण आणखी एका कारणामुळे हा चित्रपट चर्चेत आला होता. ते कारण म्हणजे या चित्रपटात करिश्मा आणि अमीरने एक किसिंग सीन शूट केला होता. या किसिंग सीनमुळेही हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिला. या सिनेमासाठी करिश्माच्या आधी जुही चावला (Juhi Chawla) या अभिनेत्रीला विचारण्यात आलं होते, असे दिग्दर्शक धर्मेश दर्शन म्हणाले होते.

या सीनमागील किस्सा –

चित्रपटातील किसिंग सीन शूट करतानाचा एक रंजक किस्सा आहे. स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन (Dharmesh Darshan) यांनी हा किस्सा सांगितला होता. या सीनआधी करिश्मा अस्वस्थ झाली होती आणि तिने हा सीन तिच्या आईसमोर शूट केला होता. हा सीन शूट करताना तब्बल ४७ रिटेक घ्यावे लागलेले. या सीनसाठी तीन दिवस लागले होते. चित्रपटातील हा सीन उटीमध्ये (Ooty) शूट करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी सांगितलं की, हा सीन केवळ करिश्माची आई बबिता कपूर (Babita Kapoor) यांच्यामुळे शूट होऊ शकला. यावेळी बबिता कपूर यांनी करिश्माला चांगल्या प्रकारे कर्फटेबल केले होते.

हे ही वाचा:

गृहविभागाकडून आडकाठी का आणली जातेय? Combine परीक्षेचा मार्ग खुला करा, अन्यथा पुन्हा एकदा….Rohit Pawar यांचा गृहविभागाला इशारा राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली; Congress शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन, काँग्रेस नेते Rahul Gandhi यांच्या जीवाला धोका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss