‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, रंगणार समाधी सोहळा

कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत आजवर बाळूमामांच्या अनेक लीला प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या.

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, रंगणार समाधी सोहळा

कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत आजवर बाळूमामांच्या अनेक लीला प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. विविध रूपात अन् विविध अवतारात बाळूमामांनी त्यांच्या अद्भुत लीलांनी त्यांच्या भक्तांना आणि ‘कलर्स मराठी’च्या प्रेक्षकांना अनेकदा अचंबित केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केले. गेली अनेक वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. पण आता ही लोकप्रिय भक्तिरसपूर्ण मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

बाळूमामांच्या अनाकलनीय आणि अवाक करणाऱ्या चरित्रातील अनेक प्रसंग रसिकांना ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत पाहायला मिळाले आहेत. शिवशंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या बाळूमामांचा नवा अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावला. महाराष्ट्र ही संताची भूमी. महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले, त्यातलेच एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणचं खूप मोठं कार्य केलं. कलर्स मराठीवर काही वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर तूफान गाजली. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातलीचं पण मोठ्या रूपातील बाळूमामांनी ज्यांनी आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवले त्या रूपालादेखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभर प्रेम दिले.

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या शेवटच्या भागात इलाज करायला आलेल्या डॉक्टरांना बाळूमामांनी परत पाठवून समाधी घेतल्याचं पाहायला मिळेल. एकंदरीतच बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडला. अवघा महाराष्ट्र ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या जयघोषाने दुमदुमला. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, ‘रमा राघव’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्या तरी बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चा Grand Premiere या रविवारी 28 जुलै, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.

Uddhav Thakeray Birthday: रश्मी-उद्धव ठाकरे यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले? जाणून घ्या हा प्रेमप्रवास…

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे “धर्मवीर-२” चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले; निर्मात्यांचा अनोखा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version