Sunday, June 30, 2024

Latest Posts

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; बिग बॉस मराठीचा ४था सीजन लवकरच सुरु होणार

'बिग बॉस मराठी ४' चा सीझन २ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

बिग बॉस हा मराठीतील एक बहुचर्चित आणि प्रसिद्ध असा एक कार्यक्रम आहे.बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच कार्यक्रमातील ड्रामा, भांडण, टास्क आणि स्पार्धकांमुळे चर्चेत असतो आणि कार्यक्रमाच्या याच वेगळेपणमुळे हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्येदेखील पुढे असतो. जेव्हापासून बिग बॉस सीजन ४ चा प्रोमो रिलीज झालाय तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनात या सीजनाबद्दल आतुरता लागून राहिली आहे.अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली असून ‘बिग बॉस मराठी’चा पुढचा सीझन म्हणजेच ‘बिग बॉस मराठी ४’ प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार हे समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन तुफान लोकप्रिय ठरला होता. हा सीजन संपल्यानंतर प्रेक्षक आता बिग बॉस मराठीच्या ४थ्या सिजनच्या प्रतीक्षेत आहेत आणि अखेर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आहे. कारण आता या शोची तारीखही समोर आली आहे. ‘बिग बॉस मराठी ४’ चा सीझन २ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे.

१०० दिवस एकाच घरात राहून हे स्पर्धक कधी एकमेकांची काळजी घेतात तर कधी एकमेकांचा जीव देखील घ्यायला निघतात. त्यामुळे संमीश्र भावना आपल्याा या शोमधून पहायला मिळत असतात. त्यामुळेच हा शो टीआरपी रेसमधील दमदार शो समजला जातो. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संभाळणार आहेत.

हे ही वाचा:

शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, गडकरींनी दिला शेतकऱ्यांना सल्ला

पितृपक्षात श्राद्ध का करावे, श्राद्ध करण्याची पद्धत काय ?… पितृपक्षाबद्दल सर्व माहिती घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss