Tunisha Sharma प्रकरणातील शिझान खानच्या जामिनावरील सुनावणी होणार ९ जानेवारीला

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी तिचा खास मित्र आणि सहकलाकार शिझान खानच्या (Sheezan Khan) अडचणीत आता हळूहळू वाढ होत चालली आहे.

Tunisha Sharma प्रकरणातील शिझान खानच्या जामिनावरील सुनावणी होणार ९ जानेवारीला

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी तिचा खास मित्र आणि सहकलाकार शिझान खानच्या (Sheezan Khan) अडचणीत आता हळूहळू वाढ होत चालली आहे. कारण शिझानच्या जामीन अर्जावरील सुनावणी हि पुढे ढकलण्यात आली आहे. या सर्व प्रकरणी पुढील सुनावणी हि सोमवारी ९ जानेवारी रोजी होणार आहे.

शिझान हा पूर्णपणे निर्दोष आहे. तसेच कुटुंबीय आणि पोलिसांच्या चौकशीचा त्याला त्रास होत आहे. परंतु नेहमी सत्याचाच विजय होतो आणि आमच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे अशी शिझानच्या वकिलांनी माहिती दिली आहे. तसेच ते पुढे म्हणाले, तुनिषाने २४ डिसेंबर २०२२ रोजी सेटवर आत्मह्त्या केली. याप्रकरणी तुनिषाच्या आईने शिझानच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आणि २५ डिसेंबर रोजी शिझानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधील अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली. वसई जवळील नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु होते आणि त्या शुटिंग दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईनं वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला २५ डिसेंबर रोजी ताब्यात घेतलं .

तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर तिचा मित्र शिझान खानवर अनेक आरोप हे लावण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला वसई न्यायालयात हजर देखील करण्यात आलं. शिझानला वसई न्यायालयाने ३१ डिसेंबर रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावली होती आणि त्यानंतर शिझानच्या जामीनासाठी वसई न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला.

अमोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तुनिषा शर्मानं शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होत. तुनिशा आणि शिजान हे दोघं सध्या सब टीव्हीच्या अलिबाबा… दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. या मालिकेच्या सेटवरच हा सर्व प्रकार घडला आहे. मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाच एक व्हिडिओ आत्महत्येच्या काही वेळ आधी तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. त्यामुळे सेटवरील कलाकारांना मोठा धक्का बसला होता. हा सर्व प्रकार लक्षत येताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

हे ही वाचा : 

दास्तान-ए-काबुल फेम २० वर्षीय अभिनेत्री Tunisha Sharmaने टीव्ही सीरियलच्या सेटवर गळफास घेत केली आत्महत्त्या

युक्रेनच्या लष्करी गुप्तचर प्रमुखांचा धक्कादायक दावा, ‘या’ आजारामुळे होऊ शकतो व्लादिमीर पुतिन यांचा मृत्यू

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version