Pathaan पठाणच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर सेन्सॉर बोर्डाने फिरवली कात्री, दीपिकाच्या भगव्या बिकिनीसह चित्रपटातील सीन कट

Pathaan पठाणच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर सेन्सॉर बोर्डाने फिरवली कात्री, दीपिकाच्या भगव्या बिकिनीसह चित्रपटातील सीन कट

येत्या वर्षात २०२३ मध्ये येणार्‍या ‘पठाण’ या चित्रपटावर सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या बहुप्रतिक्षित ‘पठान’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang ) (pathan movie song) या पहिल्या गाण्यावर लोकांचा संताप उफाळून आलेलं पाहायला मिळालं. दीपिका पदुकोणच्या ‘भगव्या बिकिनी’वरून बरेच राजकारण झाले. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली होती. या संपूर्ण वादात एक नवीन अपडेट समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सेन्सॉर बोर्डाच्या निर्मात्यांना चित्रपटात बरेच बदल करावे लागतील.

‘पठाण’मध्ये बदल होणार का?

सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘पठाण’ हा चित्रपट नुकताच CBFC परीक्षा समितीकडे प्रमाणपत्रासाठी गेला होता. सीबीएफसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा चित्रपट जवळून पाहिला गेला. समितीने निर्मात्यांना चित्रपटात काही बदल करण्याचा सल्ला दिला आहे. हे बदल चित्रपटातील गाण्यांबाबतही आहेत. समितीने पठाण यांना चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी सुधारित आवृत्ती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : 

Rajesh khanna लाखो दिलो की धडकन, पण प्रेमात ठरले अयशस्वी

म्हणजेच आता मेकर्सला गाण्याच्या एडिटिंगवर पुन्हा मेहनत घ्यावी लागणार आहे. CBFC च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंसॉर बोर्ड नेहमीच क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स आणि लोकांच्या संवेदनक्षमते दरम्यान ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करताना दिसते. तेव्हा यावर सगळेच सुवर्णमध्य शोधून काढतील अशी अशा ठेवायला हरकत नाही.

आता सेन्सॉर बोर्डानं (Censor Board) पठाणच्या मेकर्सला सिनेमात नेमके काय बदल करायला सांगितलेत याचा खुलासा सिनेमा रिलीज झाल्यावर होईल. दीपिकाच्या भगव्या बिकिनी चा रंग बदलणार का की सीन्स एडिट होणार की अख्खं गाणंच बदललेलं दिसणार? हे प्रश्न सध्या मनात आहेत. याआधी कधी कपड्यांमुळे सिनेमात बदल करायला लागलेयत ही घटना घडलेलीच नाही.

Priya Singh BodyBuilder ‘तिने’ देशाची मान उंचावली, पण स्वत:च्या राज्यात मिळाला नाही सन्मान

पठाण चित्रपट (Pathan movie) येत्या वर्षाच्या २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाद्वारे शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर परतणार आहे. पठाणमध्ये दीपिका पदुकोणसोबत शाहरुखची जोडी आहे. जेव्हा-जेव्हा दोन्ही कलाकार पडद्यावर एकत्र आले आहेत, तेव्हापासून बॉक्स ऑफिसवर धमाका झाला आहे.

Exit mobile version