boycott thankgodmovie : अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’ ह्या चित्रपटावर बहिष्कार टाकायची ‘या’ देशाची मागणी

boycott thankgodmovie : अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’ ह्या चित्रपटावर बहिष्कार टाकायची ‘या’ देशाची मागणी

गेल्या अनेक महिन्यापासून आपण सोशल मिडियावरचा बॉयकॉट ट्रेंड पाहत आहोत. मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट प्रेक्षकांनी बॉयकॉट केले आहेत. चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी जरी होत असली तरी अजून अशा कोणत्याच चित्रपटावर बंदी घातली गेलेली नाही, पण आता प्रसिद्धअभिनेते अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ हा आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

चित्रपटात चित्रगुप्ताचं चित्रण योग्य पद्धतीने केलं नसल्याने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार कुवैतमध्ये या चित्रपटावर बंदी घातल्याचं स्पष्ट झालं आहे. तिथल्या सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट तिथे प्रदर्शित करता येणार नाही असे आदेश दिले आहेत. शिवाय आता सोशल मीडियावर ‘बॉयकॉट थँक गॉड’ हा ट्रेंडही चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : 

लम्पीपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी आता क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राच्या पात्राचा एक अपघात होतो आणि मृत्यूनंतर त्याची भेट थेट चित्रगुप्ताशी होते. भारतीय पुराण ग्रंथात चित्रगुप्त हा एक असा देवता आहे जो मानवाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो. चित्रपटात अजय देवगण हा चित्रगुप्ताच्या भूमिकेत दिसत असून ते पात्र फार विनोदी दाखवण्यात आलं असल्याचं म्हंटलं जात आहे. काही भारतीय प्रेक्षकांनादेखील ही गोष्ट प्रचंड खटकली आहे. धार्मिक भावनांना धक्का लागल्याने उत्तर प्रदेशच्या एका वकिलाने या विरोधात तक्रारदेखील नोंदवली आहे.

China : चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतात ‘थँक गॉड’चा सोशल मीडियावर धुमाकूळ

अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या थँक गॉड या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यामध्ये अजय देवगणही सुरुवातीला दाखवला आहे. चित्रपटात तो चित्रगुप्त झाला आहे. तो सिद्धार्थला दाखवतो, की वासना प्रत्येक माणसामध्ये असते आणि ती नियंत्रित करावी लागते. यामध्ये नोरा पांढऱ्या रंगाच्या आउटफीट मध्ये दिसत आहे. नोरा-सिद्धार्थचे हे गाणे लोकांना पसंतीस उतरत आहे. गाण्यात योहानीच्या आवाजाचे खूप कौतुक केले जात आहे. योहानी ही श्रीलंकेची गायिका आहे.

Navratri 2022 : काय आहे नवरात्रातील अखंड ज्योतचं महत्व ? घ्या जाणून

Exit mobile version