‘कॉफी विथ करण’चे आठवे पर्व लवकरच होणार सुरू

सिने-निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या कार्यक्रमाचे सातवे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

‘कॉफी विथ करण’चे आठवे पर्व लवकरच होणार सुरू

सिने-निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या कार्यक्रमाचे सातवे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ‘कॉफी विथ करण 7’ सुरू असतानाच आता या पर्वाच्या आठव्या पर्वाची (Koffee With Karan 8) घोषणा झाली आहे.

‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनसह आणखी दोन कार्यक्रम प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहेत. ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाची घोषणा झाल्याने प्रेक्षक या सिनेमाची कार्यक्रमाची आता आतुरतेने वाट पाहत आहे. या कार्यक्रमाचा सातवा सीझन सध्या चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. एका पेक्षा एक सेलिब्रिटी या कार्यक्रमात सहभागी होत अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे.

‘कॉफी विथ करण’ या बहुचर्चित कार्यक्रमाचे आठवे पर्वदेखील प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. ‘कॉफी विथ करण’चे सहा पर्व २००४ ते २०१९ दरम्यान स्टार वर्ल्‍ड या चॅनलवर प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. पण आता हा कार्यक्रम ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसला मिळणार मराठी पक्षाध्यक्ष? सोनिया गांधींनी घेणार मोठा निर्णय

औरंगाबादची युट्युबर बिंदास काव्या अखेर सापडली

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स ठरले ब्रिटनचे नवे राजा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version