‘Adipurush’ चित्रपट करणार पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई

सध्या 'आदिपुरुष' या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणार असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

‘Adipurush’ चित्रपट करणार पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई

सध्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणार असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. ‘आदिपुरुष’ हा चित्र १६ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या संदर्भात प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंग आणि सैफ अली खान हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. मोठे कलाकार असल्यामुळे हा चित्रपट बिग बजेट चित्रपट आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट ५०० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. आदिपुरुषाचे ॲडव्हान्स बुकिंग ११ जूनपासून सुरू झाले आहे. ॲडव्हान्स बुकिंग चित्रपटाने रिलीजपूर्वीच चांगली कमाई केली आहे.

पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने जवळपास १.५० लाख तिकिटे विकली गेली आहेत. त्याची रक्कम सुमारे पाच कोटी आहे. ‘आदिपुरुष’ ऍडव्हान्स ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने पाच कोटींची कामे केली आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट भारतामधील सर्व भाषा आवृत्यांसाठी पहिल्याच दिवशी १०० कोटींची कामे करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

‘आदिपुरुष’ या चित्रपटाची फक्त भारतातच नाही तर परदेशामध्ये देखील या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाबद्दल परदेशातही चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. हा चित्रपट भारतात ६२०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. प्रभास (Prabhas) प्रभू श्रीरामाच्या तर क्रिती सनॉन(Kriti Sanon) सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. तर सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे ही वाचा:

NEET UG Result 2023: नीट परीक्षेत मुंबईच्या विद्यार्थ्याने मारली बाजी; राज्यातून पहिला

Sushant Singh Rajput ला जाऊन आज तीन वर्ष पूर्ण, कुटुंबीय आज ही शोकात…

आषाढीसाठी विठुरायाच्या दगडी मुर्त्या बाजारात सज्ज; लाखो रुपयांची उलाढाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version