spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिंदू समाजासह मुस्लिम समाजाकडूनही ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्यात आला

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट हा त्याच्या फर्स्ट लुक आल्यापासूनच चर्चेचा विषय झाला होता. तर नुकताच प्रदर्शित झालेल्या या पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang ) या गाण्यामुळे हा चित्रपट चांगलाच वादात अडकला आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) भगव्या रंगाची बिकनी घातली आहे. त्यामुळे हे गाणं आणि पठाण चित्रपट चांगलाच वादात अडकला आहे. संपूर्ण भारतातील हिंदू संघटनांनी आणि राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी या चित्रपटाचा जाहीरपणे विरोध केला आहे. पण मुख्य म्हणजे हिंदू संघटनांबरोबरच मुस्लिम संघटनांनीही पठाण चित्रपटाचा विरोध केला आहे. आणि देशभरातील मुस्लिम समाजाकडून या चित्रपटावर बहिष्कार घालण्यात येईल असे सांगण्यात आले आहे .

पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं अलीकडेच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) पेहेरावामुळे संपूर्ण भारतातून बेशरम रंग (Besharam Rang ) या गाण्यावर आणि पठाण (Pathaan) चित्रपटावरच बहिष्कार घालण्यात आलं आहे. या नंतर मध्यप्रदेशातील गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा (Dr. Narottam Mishra) यांनी पठाण चित्रपटाचा विरोध केला होता. नरोत्तम मिश्रा यांनी सांगितल होत. की जर बेशरम रंग या गाण्यातील चित्रण बदलले नाही तर मध्ये प्रदेशात पठाण चित्रपटाचे प्रदर्शन होणार नाही. आणि या चित्रपटावर बंदी मध्यप्रदेशमध्ये घालण्यात येईल. तर आता मध्य प्रदेशातील मुस्लिम संघटनांनीही पठाण चित्रपटाचा विरोध केला आहे. आणि पठाण चित्रपटावर बहिष्कार घातला आहे. तसेच देशातील मुस्लिम संघटनांनीही पाठांचा विरोध केला आहे. मध्य प्रदेशातील मुस्लिम संघटनांच्या म्हणण्यानुसार पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यातील चित्रण अश्लील असून या गाण्यामुळे मुस्लिम धर्माची बदनामी होत आहे . म्हणून हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही असे मध्यप्रदेशातील उलेमा बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

उलेमा बोर्ड (Ulema Board) बरोबरच ऑल इंडिया मुस्लिम फेस्टिव्हल कमिटीकडूनही ( All India Muslim Festival Committee ) पठाण चित्रपटाचा विरोध करण्यात आला आहे. ऑल इंडिया मुस्लिम फेस्टिव्हल कमिटीकडून सांगण्यात आले की “या चित्रपटात मुस्लिमांच्या भावना भडकावण्यात आल्या आहेत. त्यांच्या कमिटीला देशभरातील मुसलमानांकडून पठाणचा विरोध कारण्यासंदर्भात कमिटीशी संपर्क साधण्यात आला आहे.हा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले. मुस्लिम फेस्टिव्हल कमिटीकडून पुढे सांगण्यात आलं की “मुस्लिम धर्माची बदनामी करण्याची कोणालाही परवानगी नाही, मग तो अभिनेता शाहरुख खान असला तरीही त्याला सुद्धा परवानगी नाही. तर निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलावे कारण पठाण या नावाने पठाण समाजाची बदनामी होत आहे.” असेही मुस्लिम संघटनां कडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे पठाण चित्रपटाच्या समस्यांमध्ये अजून वाढ झाल्याचे दिसून येत आहे.कारण देशभरातील हिंदू संघटनांसह आता मुस्लिम संघटनांकडूनही चित्रपटाचा विरोध केला जात आहे. त्यामुळे हा वाद अजून वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

Rajabhau More नाट्यक्षेत्रासह आध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान असलेले राजाभाऊ मोरे यांचं निधन

Gautami Patil गौतमी पाटीलच्या चालू कार्यक्रमात दगडफेक, चाहते चढले स्टेजवर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss