२९ जून रोजी ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला. अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट चाहत्यांच्या मनात आपले घर करत आहे. सोशल मीडियावर अनेक जण पोस्ट शेअर करुन ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचं आतोनात कौतुक करत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. चला तर मग या चित्रपटानं रविवारी (२ जुलै) किती कमाई केली? हे जाणून घेऊ.
‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटानं पहिल्या दिवशी ९. ५ कोटी रुपये कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं ७ कोटींचा व्यवसाय केला. पण वीकेंडला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला शनिवारी चित्रपटाने १०. १० कोटींचे कलेक्शन केले होते. तसेच रविवारी २ जुलै रोजी या चित्रपटानं तब्ब्ल १२ कोटींची कमाई केली आहे. आता पर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई ३८.३५ कोटी इतकी झाली आहे.
‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समीर विद्वांस (Sameer Vidwans) या मराठमोळ्या दिग्दर्शकानं सांभाळली आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामध्ये कार्तिक आणि कियारा यांच्यासोबतच सुप्रिया पाठक कपूर (Supriya Pathak Kapoor), गजराज राव (Gajraj Rao), सिद्धार्थ रंधेरिया (Siddharth Randheria), अनुराधा पटेल (Anuradha Patel), राजपाल यादव (Rajpal Yadav), आणि शिखा तल्सानिया (Sikha Talsania) या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या कथानकाचे अनेक जण कौतुक करत आहेत.
हे ही वाचा:
भाजपच्या बड्या नेत्याने केलं मोठ वक्तव्य, आणखी भूकंप होणार…
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर रोहित पवार म्हणाले, राजकारणात का आलो…