वर्षाचा अखेर मनोरंजनात्मक, ‘गोविंदा नाम मेरा’ ते ‘सर्कस’; डिसेंबरमध्ये चित्रपटांची मोठी मेजवानी

वर्षाचा अखेर मनोरंजनात्मक, ‘गोविंदा नाम मेरा’ ते ‘सर्कस’; डिसेंबरमध्ये चित्रपटांची मोठी मेजवानी

चित्रपटप्रेमींसाठी डिसेंबर महिना खूप खास असणार आहे, कारण त्यांना या महिन्यात असे अनेक चित्रपट पाहायला मिळणार आहेत जे केवळ उत्तमच नाहीत तर पडद्यावर त्यांची इतर चित्रपटांशी स्पर्धाही पाहायला मिळणार आहे. या महिन्यात अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ज्याची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. वर्षाचा अखेरचा महिना खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या महिन्यात अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रिलर आणि अॅक्शनचा तडका असणारे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात कार्तिक आर्यनच्या ‘फ्रेडी’पासून विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’ सारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे.

इंडिया लॉकडाउन

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याकाळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या लॉकडाऊनवर बेतलेला ‘इंडिया लॉकडाउन’ हा सिनेमा आहे. मधुर भंडारकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, प्रतीक बब्बर, सई ताम्हणकर आणि प्रकाश बेलावाडी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा ‘झी 5’वर रिलीज झाला आहे.

हेही वाचा : 

मनसे नेते वसंत मोरेंना राष्ट्रवादीकडून ऑफर, अजित पवार म्हणाले तात्या कधी येता?

सलाम वेंकी

‘सलाम वेंकी’ हा सिनेमा एका आई आणि मुलावर आधारित आहे. सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा प्रेक्षक ९ डिसेंबरपासून सिनेमागृहात पाहू शकतात.

कैट

एका निरपराध माणसावर भाष्य करणारा कैट हा सिनेमा आहे. या सिनेमात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना ९ डिसेंबरपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

Gujrat Election पंतप्रधान मोदी व अमित शहा आज मतदानाचा हक्क बजावणार, ९३ जागांवर आठशेच्यावर उमेदवार नशीब आजमावणार

सर्कस

‘सर्कस’ या बहुचर्चित सिनेमात जॅकलिन फर्नांडीस, पूजा हेगडे, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, मुकेश तिवारी, सिद्धार्थ जाधव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात रणवीर दुहेरी भूमिकेत आहे. २३ डिसेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

गोविंदा नाम मेरा

‘गोविंदा नाम मेरा’ या सिनेमात विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. १६ डिसेंबरला हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Datta Jayanti 2022 दत्तजयंतीनिम्मित जाणून घ्या भगवान दत्ताची कथा

Exit mobile version