तेजस्विनीने दिले पहिल्यांदीच स्पष्टीकरण…

बहुचर्चित आदिपुरुष हा चित्रपट ओम राऊत आणि दिग्दर्शित केला आहे. आदिपुरुष या चित्रपटावर अनेकांनी टीकांचा वर्षाव केला आणि त्यामुळे आता सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले आहे.

तेजस्विनीने दिले पहिल्यांदीच स्पष्टीकरण…

बहुचर्चित आदिपुरुष हा चित्रपट ओम राऊत आणि दिग्दर्शित केला आहे. आदिपुरुष या चित्रपटावर अनेकांनी टीकांचा वर्षाव केला आणि त्यामुळे आता सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांमध्ये नाराजी आहे. चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. आदिपुरुष हा चित्रपट कोणत्याच पातळीवरून प्रेक्षकांना पसंत पडलेला नाही हे दिसून आलेले आहे. आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएननं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन केलेल्या निवेदनामध्ये लिहिले आहे की, आदिपुरुष या चित्रपटाचे शो तातडीने थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे. आदिपुरुष चित्रपटामध्ये जे काही मांडण्यात आले आहे ते सर्व आमच्या मनामधील रामायण नाही. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना दाखवून आणखी वाद निर्माण करण्यात येऊ नये. चित्रपट बंद करण्यात यावा अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे. १६ जून आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. जेव्हापासून चित्रपट सातत्याने सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय झाला आहे. पण एकीकडे टीका होत असली तरी या सगळ्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडित मात्र चांगलीच भाव खाऊन गेली आहे. ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमात मराठी अभिनेता देवदत्त नागे असणार हे सर्वांनाच ठाऊक होते, या चित्रपटात तेजस्विनीचे दिसणे हे सर्वांनाच आश्चर्य आणि आनंद देऊन केले. एका बिग बजेट सिनेमात तेजस्विनी झळकल्याने तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. पण या चित्रपटात काम करून तिला नेमकं कसं वाटलं यावर ती पहिल्यांदाच बोलली आहे.

आदिपुरुष’ मध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने शूर्पणखाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत ती अत्यंत रेखीव आणि सुंदर दिसत आहे. पण एवढ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता याबाबत तिने आपल्या भावना नुकत्याच व्यक्त केल्या आहेत. एका माध्यमाल दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘या चित्रपटात मी छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे शूर्पणखेची. या चित्रपटाचा मला भाग होता आलं की माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.”ओम राऊत मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत असल्यापासून त्याची आणि माझी मैत्री आहे. तो या चित्रपटात शूर्पणखाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होता आणि मी त्याची पहिली पसंती होते.त्याने केलेल्या अभ्यासातून त्याला हे जाणवलं की शूर्पणखा खूप सुंदर होती. त्यामुळे या भूमिकेसाठी मला कास्ट करण्याबाबत तो ठाम होता.

हे ही वाचा:

वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पवारांचा पक्ष करतोय निष्ठेसाठी आंदोलन! | NCP | Sharad Pawar |

अंबरनाथमध्ये स्लॅबचा भाग कोसळून एक जण जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version