‘Kuttey’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तब्बू (Tabu) यांच्या आगामी 'कुट्टे' (Kuttey Movie First Look) या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.

‘Kuttey’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

Kuttey Movie First Look : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तब्बू (Tabu) यांच्या आगामी ‘कुट्टे’ (Kuttey Movie First Look) या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अर्जुन कपूर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक छोटी क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याच्याबरोबर तब्बू, नसीरुद्दीन शाह, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज, कोंकणा सेन शर्मा यांचा लूक पाहायला मिळतोय.

कुट्टेचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांचा मुलगा आस्मान भारद्वाज करणार आहे. यामुळे त्याचे दिग्दर्शनातही पदार्पण होणार आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये, निर्माता-दिग्दर्शक विशालने सोशल मीडियावर जाऊन चित्रपटातील एक आकर्षक मोशन पोस्टर शेअर केले. त्याच मानवी शरीरे पण कुत्र्याचे डोके होते. कुट्टे हा केपर-थ्रिलर आहे. लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग, रेखा भारद्वाज यांनी ‘कुत्ते’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याचे संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले असून गीत गुलजार यांनी लिहिली आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी १३ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी अर्जुन कपूर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पटनीबरोबर स्क्रीन शेअर केली होती.

हे ही वाचा : 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला तिच्या आयुष्यातील धक्कादायक खुलासा

Avatar The Way of Water २०२२ चा अखेरचा महिना अवतार साठी ठरणार लाभ दायक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version