Bai Ga चित्रपटाचं पहिलं गाणं आऊट, प्रेक्षक अनुभवणार ‘जंतर मंतर’ ची जादू

अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte), कविता राम (Kavita Raam), मुघदा कऱ्हाडे, शरायू दाते, श्वेता दांडेकर, सुसमिराता दावलकर, संचिता मोरजकर ह्यांनी 'जंतर मंतर' ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे.

Bai Ga चित्रपटाचं पहिलं गाणं आऊट, प्रेक्षक अनुभवणार ‘जंतर मंतर’ ची जादू

अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) या गाण्यात वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत आपला जलवा दाखवताना ‘बाई गं’ (Bai Ga) या चित्रपट दिसणार आहे. सुकन्या मोने (Sukanya Mone), प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere), अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar), दीप्ती देवी (Dipti Devi), नम्रता गायकवाड (Namrata Gaikwad), नेहा खान (Neha Khan) ह्यांनी जंतर मंतर (JantarMantar) ह्या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगवली आहे. मितवा (Mitwaa) नंतर स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) आणि प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) ह्यांची जोडी ‘बाई गं’ (Bai Ga) ह्या चित्रपटात दिसणार आहे त्यामुळे ह्या जोडी चा एक वेगळाच फॅनबेस ह्या सिनेमासाठी उत्सुक आहे. ते म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो पण जेव्हा एक नाही चक्क सहा बायकां असतील तर त्या पुरुषाची हालत काय असेल हे येत्या १२ जुलैला ‘बाई गं’ या चित्रपटातून आपल्याला कळेल आणि आज ह्याच चित्रपटाची एक छोटीशी झलक ‘जंतर मंतर’ (JantarMantar) या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळते.

अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte), कविता राम (Kavita Raam), मुघदा कऱ्हाडे, शरायू दाते, श्वेता दांडेकर, सुसमिराता दावलकर, संचिता मोरजकर ह्यांनी ‘जंतर मंतर’ ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर वरून लिखाते ह्यांचं संगीत आहे. गाण्याचे बोल मंदार चोळकर ह्यांनी लिहिले आहेत. ‘जंतर मंतर’ हे गाणं आपल्याला एवरेस्ट एंटरटेनमेंट वर पाहायला मिळेल. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. एक अभिनेता आणि तब्बल ६ अभिनेत्री ही संकल्पनाच प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. १२ जुलैला ‘बाई गं’ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ चं गाणं ‘जंतर मंतर’ रिलीझ होताच प्रेक्षकांना भुरळ घातल्याचं पाहायला मिळत आहे.

Exit mobile version