spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बिग बॉस मराठीचा चौथा सीजन पुन्हा लांबणीवर

येत्या 11 सप्टेंबरला 'बिग बॉस मराठी'चा चौथा सीजन लॉन्च होणार होता

बिग बॉस हा मराठीतील एक बहुचर्चित आणि प्रसिद्ध असा एक कार्यक्रम आहे.बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच कार्यक्रमातील ड्रामा, भांडण, टास्क आणि स्पार्धकांमुळे चर्चेत असतो आणि कार्यक्रमाच्या याच वेगळेपणमुळे हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्येदेखील पुढे असतो. जेव्हापासून बिग बॉस सीजन ४ चा प्रोमो रिलीज झालाय तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनात या सीजनाबद्दल आतुरता लागून राहिली आहे.पण एका वृत्तानुसार, या सीजनसाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.

बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन तुफान लोकप्रिय ठरला होता. हा सीजन संपल्यापासूनच प्रेक्षकांना चौथ्या सीजनची प्रतीक्षा लागून होती. काही दिवसांपूर्वी या शोचा प्रोमोसुद्धा रिलीज झाला होता. त्यावरुन दरवर्षी प्रमाणे यंदाही अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संभाळणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. येत्या 11 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीजन लॉन्च होणार होता. मात्र, यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या बिझी शेड्युलमुळे निर्मात्यांनी या शोचं लॉन्चिंग पुढे ढकललं आहे.

तसेच या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी अजूनही नक्की झालेली नाहीय. या शोसाठी मराठी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. मात्र काही कलाकार अद्यापही शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचार करत आहेत. त्यामुळे स्पर्धकांची यादी फायनल झालेली नाहीय. अशातच आता शो पुन्हा लांबणीवर पडणार हे ऐकून चाहते निराश होत आहेत.

हे ही वाचा:

ब्रह्मास्त्र प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल

‘सीएसके’ चा कॅप्टन धोनी राहणार की जाणार? सीएसकेने घेतला मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss