Bigg Boss Marathi 4 चा महाअंतिम सोहळा दणक्यात पडला पार, ‘या’ अभिनेत्याचा झाला विजय

मराठी बिग बॉस हा कलर्स मराठी वरील रिऍलिटी शो चे चौथ पर्व चालू होते. या वेळीही या शो ने लोकांचे मनोरंजन केले. बिग बॉस (big boss) मधील प्रत्येक स्पर्धक हा तगडा होता. खेळ खेळताना सपर्धाकांमधील स्पर्धा पाहायला प्रेक्षकांना खूप आवडते.

Bigg Boss Marathi 4 चा महाअंतिम सोहळा दणक्यात पडला पार, ‘या’ अभिनेत्याचा झाला विजय

मराठी बिग बॉस हा कलर्स मराठी वरील रिऍलिटी शो चे चौथ पर्व चालू होते. या वेळीही या शो ने लोकांचे मनोरंजन केले. बिग बॉस (big boss) मधील प्रत्येक स्पर्धक हा तगडा होता. खेळ खेळताना सपर्धाकांमधील स्पर्धा पाहायला प्रेक्षकांना खूप आवडते. एक रंजक वळण या खेळांमध्ये नेहमी येत असत. अश्या या बिग बॉस ४ मराठी रिऍलिटी शो (big boss marathi reality show )पर्व चौथे चा महाअंतिम सोहळा काल दि. ८ जानेवारी रोजी पार पडला. अक्षय केळकर (akshay kelkar) हा बिग बॉस मराठी पर्व ४ चा विजेता ठरला आहे. बिग बॉस मधील प्रत्येक स्पर्धकाने अक्षयचे अभिनंदन ही केले. तसेच प्रेक्षकांनी अक्षय केळकरचे कौतुक केले. बिग बॉसच्या घरात असल्यापासून अक्षय हुशारीने खेळात होता. मुद्याला धरून वाद करणे हे बहुतेकदा काहीना जमत नसे पण अक्षय यात माहीर होता. घरातल्या सगळ्यांशी मैत्री करून अक्षय हुशारीने खेळत होता .

 

विजेता कोण ठरणार या उत्तराची आतुरता सर्व प्रेक्षकांना होती. १६ स्पर्धकांमधून शेवटी २ स्पर्धक शेवटच्या टप्प्यात होते. अपूर्वा नेमळेकर (apurva nemlekar) आणि अक्षय केळकर (akshay kelkar) हे दोघेही शेवटच्या टप्प्यात होते. शेवटी अक्षय केळकरला विजेता घोषित करण्यात आलं. अक्षयला १५ लाख ५५ हजार रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनंदानाच्या शुभेच्छा देत लाईक्स आणि कमेंट्रस करत आहेत. पहिल्या पासूनच अक्षय चे स्पष्ट बोलणे , हजरजबाबी पना, खिलाडूवृत्ती , टास्क जिकंण्यासाठी केलेली युक्ती यामुळे तो सतत चर्चेत असायचा. सोशल मीडियावर (social media )अक्षयला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय केळकर हा एक चांगला अभिनेता असून भाकरवडी (bhakarwadi )या हिंदी मालिकेतून तो नावारूपाला आला. तसेच दोन कटिंग शॉर्ट फिल्म , टकाटक २ चित्रपट यामध्ये काम करून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

हे ही वाचा:

राशी भविष्य, ९ जानेवारी २०२३ , किरकोळ आजाराने दैनंदिन जीवनात…

पुण्याच्या अभिजित कटकेने पटकावला हिंदकेसरी किताब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version