धनुषचा अनोखा अंदाज; पारंपरिक वेशानं वेधलं सर्वांचं लक्ष

सर्वांच्या नजरा त्याच्या पांढऱ्या लुंगी आणि शर्टवर खिळल्या होत्या.

धनुषचा अनोखा अंदाज; पारंपरिक वेशानं वेधलं सर्वांचं लक्ष

धनुषचा अनोखा अंदाज.

मुंबई:  रांझना’ स्टार धनुषचा हॉलिवूड चित्रपट ‘द ग्रे मॅन’ खूप चर्चेत आहे. त्याचवेळी चित्रपटाच्या प्रीमियरचे फोटो व्हायरल होत आहेत. कारण धनुषच्या स्टाइलने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

हेही वाचा:

शुल्लक कारणावरून मेट्रोमध्ये भांडण, भांडणाचे कारण ऐकून थक्क व्हाल.

हॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अँथनी आणि जो रुसो सध्या त्यांच्या आगामी ‘द ग्रे मॅन’ चित्रपटामुळे चर्चेतआहेत. या दिग्दर्शक जोडीने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स कॅप्टन अमेरिका: द विंटर सोल्जर’ ते ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंड गेम’ पर्यंत अनेक चित्रपटदिग्दर्शित करून सर्वांची मने जिंकली आहेत. त्याचवेळी त्याचा नुकताच आलेला हॉलिवूड चित्रपट ‘द ग्रे मॅन’ जगासह भारतात चर्चेतआहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार धनुषही दिसणार आहे. अलीकडेच चित्रपटाचा प्रीमियर झाला जेथे धनुषने सर्वांचे लक्ष वेधूनघेतले कारण तो या कार्यक्रमात पांढरा हाफ स्लीव्ह शर्ट, लुंगी आणि सँडल परिधान केले होते. लॉस एंजेलिसमध्ये चित्रपटाचा प्रीमियर झाल्यानंतर, 20 जुलै रोजी मुंबईत रुसो ब्रदर्सने प्रीमियर केला होता. या प्रीमियरमधील धनुष इतका खास होता की आता तो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर लोकांना धनुषची ही स्टाईल इतकी आवडली आहे की लोकत्याचे कौतुक करताना थकत नाहीएत. हॉलिवूड स्टार्सनी संपूर्ण भरलेल्या या कार्यक्रमात, जिथे प्रत्येकजण सूट बूटमध्ये दिसत होता, तिथे धनुष आपल्या साधेपणाने संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसला. सर्वांच्या नजरा त्याच्या पांढऱ्या लुंगी आणि शर्टवर खिळल्या होत्या.

या कार्यक्रमाचे व्हिडिओ केवळ धनुषच्या पोशाखामुळेच नव्हे तर त्याच्या विनम्रतेमुळे व्हायरल झाला आहे. या व्हिडिओंमध्ये धनुषभारतीय शैलीत हात जोडून कोणाचे तरी स्वागत करत आहे. मुंबईत ‘द ग्रे मॅन’च्या प्रीमियरला रायन गोसलिंग, ख्रिस इव्हान्सचे दिग्दर्शक अँथनी आणि जो रुसोही उपस्थित होते. यासोबतच विकीकौशल, दिग्दर्शक राज आणि डीके, रणदीप हुडा, सिद्धार्थ रॉय कपूर, विशाल भारद्वाज, आनंद एल राय, बाबिल खान हे बॉलिवूड मधील कलाकार उपस्थित होते.

Exit mobile version