‘The Kashmir Files’ प्रोपगेंडा फिल्म, IFFIच्या ज्युरींचं मत

‘The Kashmir Files’ प्रोपगेंडा फिल्म, IFFIच्या ज्युरींचं मत

IFFI म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India) . हा महोत्सव या वर्षी गोव्यात भरवण्यात आला होता आणि तो यशस्वीपणे पार देखील पडला. हे वर्ष आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच ५३ वर्ष होत. या वर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात IFFI ज्युरी प्रमुख नादव लॅपिड (Nadav Lapid) यांनी अभिनेता अनुपम खेर (Actor Anupam Kher) यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला अश्लील आणि अपप्रचार म्हणून संबोधित केले आहे .तसेच द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं आहे . यामुळं आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

गोव्यातील इफ्फी चित्रपट महोत्सव हा नेहमीच चर्चेत असणारा महोत्सव आहे. या मोह्त्सवात हजेरी लावण्यासाठी जगभरातून सर्व अभिनेते, दिग्दर्शक , अभ्यासक उपस्थिती लावतात. अशावेळी जगभरातील सिनेप्रेमींना, रसिकांना या महोत्सवात कायम एक नवीन अनुभव मिळतो. तसेच या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. यावेळेस IFFI ज्युरी प्रमुख नादव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर एक वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की, “काश्मीर फाईल्स हा चित्रपट इफ्फीच्या महोत्सवात आलाच कसा, तो या महोत्सवामध्ये येणं ही मोठी धक्कादायक बाब आहे. याचे कारण म्हणजे तो एक प्रचारकी चित्रपट आहे. काश्मीर फाईल्स ही प्रपोगंडा फिल्म आहे.” नादव लॅपिड यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावरून नेटकरी, अभिनेते मोठ्या प्रमाणात लॅपिड यांचा निषेध करत आहेत.त्याचवेळी, चित्रपट निर्माते अशोक पंडित, इस्रायलचे भारतातील राजदूत आणि मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनीही लॅपिडच्या विधानावर आक्षेप नोंदवला आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्ग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा ट्विट करत निषेध व्यक्त केला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट मध्ये असे लिहिले आहे की “सत्य ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. हे लोकांना खोटं बोलण्यास भाग पडते.” असे लिहीत विवेक अग्निहोत्री यांनी नादव लॅपिडना टोला लगावला आहे .

Jio नेटवर्कची मोठी समस्या, अद्याप कंपनीकडून स्पष्टीकरण नाही

Exit mobile version