हवाहवाई’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

"द ग्रेट इंडियन" या बहुचर्चित मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री निमिषा संजयनच मराठीत प्रदार्पण होणारा 'हवाहवाई' या चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे.

हवाहवाई’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

“द ग्रेट इंडियन” या बहुचर्चित मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री निमिषा संजयनच मराठीत प्रदार्पण होणारा ‘हवाहवाई’ या चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडीयावर लाँच झाले आहे. अभिनेत्री निमिषा सजयन आणि अभिनेता विजय आंदळकर ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

 

अक्षय कुमार, जयाप्रदा ,हेलन या हिंदी कलाकारांनी महेश टिळेकर यांच्या आधीच्या चित्रपटातून मराठीमध्ये प्रदार्पण केले आहे. त्यात आता मल्याळम अभिनेत्री या सुष्टीतील निमिषा संजयनच यात भर पडली आहे. साउथमधील कलाकार आता मराठी चित्रपटात येण्याचा आता नवीन ट्रेण्ड ‘हवाहवाई’ या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

तसेच ‘हवाहवाई’ या चित्रपटात निमिषा संजयन सोबत तसेच आपल्याला वर्षा उसगांवकर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. संजीवनी जाधव, समीर चौगुले , सिद्धार्थ जाधव, महेश जोशी हे कलाकार सुद्धा आपल्याला विविध भूमिका साकारताना दिसणार आहे. यामुळे चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नक्कीच शंका नाही.

हे ही वाचा :

आज अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि पूजा करण्याची पद्धत

 

Exit mobile version