Tunisha Sharma Suicide Case पोलिसांनी केली तुनिषाच्या कुटुंबियांची गुप्त ठिकाणी चौकशी केली, हे सत्य आले समोर

Tunisha Sharma Suicide Case पोलिसांनी केली तुनिषाच्या कुटुंबियांची गुप्त ठिकाणी चौकशी केली, हे सत्य आले समोर

मुंबई पोलीस टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येचं गुढ उकलण्यासाठी काम करत आहेत. दरम्यान या प्रकरणाबाबत असे काही धक्कादायक अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत. त्याचवेळी, तुनिषा शर्माने आत्महत्या करण्यापूर्वी प्रियकर शिझान सोबत तासंतास गप्पा मारल्याच्या बातम्या आहेत. त्यानंतर तुनिषाने गळफास लावून आत्महत्या केली. अशा परिस्थितीत या दोघांच्या गप्पांमध्ये असे काय घडले की तुनिषाने आपले जीवन देण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. आता सध्या पोलीस तुनिषाच्या कुटुंबाची चौकशी करत आहेत.

हेही वाचा :

युवासेचा वाद पुन्हा चव्हाट्यावर, युवासेना तालुका प्रमुखाने केला आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. या प्रकरणातील आरोपी शिझान खानच्या जबाबासोबतच पोलीस तुनिषा शर्माची आई, मामा आणि काकू यांचीही चौकशी करत आहेत. पोलिसांनी तिघांच्या जबाबासाठी गुप्त जागा निवडली होती, जिथे कुटुंबीयांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवले गेले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तुनिषाने सांगितले की, तिचे मृत्यूपूर्वी काही वेळ तुनिषाशी बोलणे झाले होते. या प्रकरणी आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून अनेकांच्या विविध गोष्टी समोर येत आहेत. या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे, जेणेकरून ठोस पुरावे गोळा करता येतील. आरोपी शीजान खानला उद्यापर्यंत पोलिस कोठडी. आरोपींच्या कोठडीत वाढ करावी लागणार का, याबाबत पोलिसांचा युक्तिवाद सुरु आहे.

Gold Hallmarks बनावट हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या विक्रीवर सरकार घालणार आळा, काय असेल योजना

दुसरीकडे, पोलिस आरोपी आणि तुनिषाचे चॅट स्कॅन करत आहेत. सुमारे २००-२५० पानांचे चॅट समोर आले आहेत. या प्रकरणाबाबत पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. कारण आता सर्वांच्या नजरा या हायप्रोफाईल प्रकरणाकडे लागल्या आहेत. शीजान खानबाबत अनेक थिअरी समोर येत आहेत, तुनिषाची आई शीजानशी लग्न करण्यास तयार नव्हती, तर कधी अभिनेत्रीची आई लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले जात होते.

मोदींच्या मातोश्री विषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं ट्विट

Exit mobile version