spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बहुचर्चित सिनेमा ‘टाईमपास 3’ लवकरच होणार प्रदर्शित

टाइमपास म्हटलं की आठवते ती दगडू आणि प्राजुची अपूर्ण लव्हस्टोरी, जी आपल्याला टाइमपास2 मध्ये पूर्ण होताना दिसते.

टाइमपास म्हटलं की आठवते ती दगडू आणि प्राजुची अपूर्ण लव्हस्टोरी, जी आपल्याला टाइमपास2 मध्ये पूर्ण होताना दिसते. पण, प्राजू दगडूच्या आयुष्यातून निघून गेल्यावर दगडूचं काय झालं? हेच सांगणारी कथा घेऊन ‘टाइमपास 3’ हा सिनेमा येत आहे.

झी स्टुडिओज आणि अथांग कम्युनिकेशन निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटाच्या गाण्यांनी आणि टिझरने आधीच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचवली होती. आणि नुकत्याच एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घातली आहे. या प्रदर्शन सोहळ्याला रवी जाधव, झी स्टडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी आणि निर्मात्या मेघना जाधवसुद्धा उपस्थित होते.

या सिनेमाची अजून एक खासबात म्हणजे फुलपाखरू फेम हृता दुर्गुळे ही कधीच न पाहिलेल्या रावडी आणि एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. प्राजूच्या एक्झिट नंतर दगडूच्या आयुष्यात आलेली ही पालवी एकदमच बिनधास्त आहे आणि या सिनेमात दगडू आणि पालवीची धमाल लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळेसह वैभव मांगले, भाऊ कदम, आरती वडगबाळकर आणि संजय जाधव सुध्दा प्रमुख भूमिकेत दिसून येणारं आहेत. रवी जाधव दिग्दर्शित आणि प्रियदर्शन जाधव लिखित 2 नंबर लवचा 1 नंबर लोचा अशा टॅगलाईनसह 29 जुलै ला प्रदर्शित होणारा हा सिनेमा प्रेक्षकांना किती पसंत पडतोय, हे आता कळेलच.

हेही वाचा : 

‘हीच ती वेळ’ आदित्य ठाकरेंचे युवासेनेला आदेश

Latest Posts

Don't Miss