spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नागीन सेटवर आला खराखुरा नाग

कलर्स टीव्ही या वाहिनीवरील एकता कपूर ची प्रसिद्ध मालिका नागीन ही मालिका नेहमीच चर्चेत असते.बिग बॉस हिंदी ची विनर तेजस्वी प्रकाश ही बिग बॉस नंतर लगेचच नागीन या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत आली.

कलर्स टीव्ही या वाहिनीवरील एकता कपूर ची प्रसिद्ध मालिका नागीन ही मालिका नेहमीच चर्चेत असते.बिग बॉस हिंदी ची विनर तेजस्वी प्रकाश ही बिग बॉस नंतर लगेचच नागीन या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत आली. त्यानंतर तिला चांगलीच प्रसिध्दी देखील मिळतेय. काही दिवसांपूर्वी या मालिकेचं शूटिंग मुबंईतील एका स्टुडिओ मध्ये सुरु होतं तेव्हा तिथे भयानक प्रकार घडला आहे. शूटिंग सेटवर आजूबाजूला बरीच मोठ मोठी झाडे आहेत.आणि शूटिंग करताना सेटवर खरा खुऱ्या नागाने एन्ट्री घेतली. नागाला पाहून संपूर्ण टीम ची तारांबळ उडाली आणि सगळे पळू लागले.

सोशल मीडियावर याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. म्हंटलं जात आहे की नागीन 6 च्या सेटवर अचानकपणे तो नाग  झाडावरून आला आणि तो झाडावर लटकायला लागला तेव्हा सर्वांचं त्याच्याकडे लक्ष गेलं त्याला पाहून सगळ्याना घाम फुटला. भला मोठा नाग बाहेर कसा काढायचा हे कोणालाही कळत नव्हतं. मात्र तिथल्या टीम मेम्बर्स नी प्रयत्न पुर्वक नागाला एक लाकडी दांड्याच्या मदतीनं हळूच पकडून योग्य त्या ठिकाणी सोडलं. नागाला सोडल्यानंतर सगळ्यांची चिंता मिटली आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात झाली.

हा व्हिडीओ चाहत्यांनी पहिला तेव्हा तेजस्वी चे चाहते चिंतेत पडले.तेजस्वी ला काही झालं तर नाही ना,ती ठीक आहे ना अशा अनेक कमेंट्स येऊ लागल्या आहेत. सेटवर शूटिंग करताना नेहमीच काळजी घेत जा असा सल्ला देखील चाहत्यांनी दिला आहे. पण नाग सेटवर अचानक आला असला तरीही त्याच्या मुळे कोणालाही कसलाही त्रास झालेला नाही. तेजस्वी सोबतच कोणत्याही मेम्बर्स ना दुखापत झाली नसून सर्वजण सुरक्षित आहेत.तेजस्वीच्या पर्सनल लाईफ बद्दल सांगायचं झालं तर ती बिग बॉस सीझन 15 मध्ये काम करत असताना करण कुंद्रा सोबत प्रेम झालं यानंतर दोघांचं प्रेम अजूनही बरंच चर्चेत ठरत आहे. त्याच बरोबर त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील वाढ होत आहे.

Latest Posts

Don't Miss