spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mission Majnu अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ची रिलीज डेट झाली जाहीर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या 'मिशन मजनू' (Mission Majnu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते.

Mission Majnu Release Date Announce : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपट ‘मिशन मजनू’बद्दल बरीच चर्चा झाली आहे. रॉनीच्या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​भारतीय रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.’मिशन मजनू’ हा थराथ नाट्य असणारा सिनेमा २० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थसह या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची सिद्धार्थच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

आज निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरवरून चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्राचा लूकही समोर आला आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पोस्टर समोर येताच सिद्धार्थच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. आज निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरवरून चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्राचा लूकही समोर आला आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पोस्टर समोर येताच सिद्धार्थच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. ‘मिशन मजनू’च्या पोस्टरमधील सिद्धार्थच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. डोळ्यात काजळ, गळ्यात ताबीज आणि बेधडक नजर असा सिद्धार्थचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात सिद्धार्थ रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका एका पाकिस्तानात राहणाऱ्या मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आणि रश्मिकाच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

 सिद्धार्थने सोशल मीडियाच्या माध्यमातून या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करत सिद्धार्थने लिहिलं आहे,”एका रॉ एजंटची कहानी… ‘मिशन मजनू’ हा सिनेमा २० जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थच्या या अँक्शन-पॅक्ड चित्रपटाची कथा पाकिस्तानच्या भूमीवर भारताच्या सर्वात महत्त्वाच्या RAW ऑपरेशनवर आधारित आहे. हा चित्रपट १९७० च्या दशकातील वास्तविक घटनांपासून प्रेरित आहे. ‘मिशन मजनू’ अशा सैनिकांची कहाणी सांगतो, जे देशसेवेत आपले प्राण बलिदान देतात, पण त्यांच्या कथा कधीच कोणाच्या समोर येत नाहीत.

हे ही वाचा : 

Viral video भररस्त्यात हार्ट अटॅक आलेल्या वृद्ध व्यक्तीला, महिला पोलिसाने सीपीआरनं दिले जीवनदान

‘या’ कारणामुळे रितेशने केली ‘Ved’ चित्रपटासाठी अजय-अतुलची निवड

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss