Mission Majnu अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ची रिलीज डेट झाली जाहीर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या 'मिशन मजनू' (Mission Majnu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते.

Mission Majnu  अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ची रिलीज डेट झाली जाहीर

Mission Majnu Release Date Announce : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपट ‘मिशन मजनू’बद्दल बरीच चर्चा झाली आहे. रॉनीच्या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​भारतीय रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.’मिशन मजनू’ हा थराथ नाट्य असणारा सिनेमा २० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थसह या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची सिद्धार्थच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

आज निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरवरून चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्राचा लूकही समोर आला आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पोस्टर समोर येताच सिद्धार्थच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. आज निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरवरून चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्राचा लूकही समोर आला आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पोस्टर समोर येताच सिद्धार्थच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. ‘मिशन मजनू’च्या पोस्टरमधील सिद्धार्थच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. डोळ्यात काजळ, गळ्यात ताबीज आणि बेधडक नजर असा सिद्धार्थचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात सिद्धार्थ रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका एका पाकिस्तानात राहणाऱ्या मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आणि रश्मिकाच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

हे ही वाचा : 

Viral video भररस्त्यात हार्ट अटॅक आलेल्या वृद्ध व्यक्तीला, महिला पोलिसाने सीपीआरनं दिले जीवनदान

‘या’ कारणामुळे रितेशने केली ‘Ved’ चित्रपटासाठी अजय-अतुलची निवड

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version