‘सुभेदार’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे …

मराठी मनोरंजनसृष्टी (Marathi entertainment) पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत.

‘सुभेदार’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे …

मराठी मनोरंजनसृष्टी (Marathi entertainment) पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

‘सुभेदार’ (Subhedar) हा ऐतिहासिक सिनेमा काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रेक्षक या बहुचर्चित सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. १८ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या या सिनेमाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली आहे. चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तान्हाजी मालुसरेंच्या भुमिकेत अजय पुरकर झळकत आहेत. सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, तर त्यांच्या पत्नी यशोदाबाईंची भूमिका शिवानी रांगोळे हिने साकारली आहे. मालुसरे कुटुंबीयतील महत्वाचे सदस्य असलेल्या शेलारमामांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी दिसणार आहे. तान्हाजीरावांच्या आईची भुमिका पार्वतीबाईंच्या भूमिकेत उमा सरदेशमुख आणि रायबाची भुमिका अर्णव पेंढारकर दिसत आहे.

नाटक मालिका आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा भरत जाधव (Bharat Jadhav) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. भरतनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. भरतनं अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. आता त्याचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या नाटकाबद्दल नुकतीच भरतनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. सध्या भरत जाधव यांची ‘तू तू मी मी’, ‘सही रे सही’, ‘मोरूची मावशी’ ही नाटकं सुरू आहेत. आता त्यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासंबंधीचा व्हिडीओ भरत जाधव यांनी सोशल मीडियावर शेअर करीत ‘लवकरच’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची मोठी कामगिरी; फडकवला तिरंगा

Taali Web Series, सुष्मिताला सलाम! आज या ओटीटी वर रिलीझ…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version