हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधावर सुबोध भावेंनी मांडली भुमिका, ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काम करणार नाही

हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधावर सुबोध भावेंनी मांडली भुमिका, ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काम करणार नाही

har har mahadev : हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटाचा वाद चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यापासूनच सुरु झाला होता. तो काही थांबायचं नावच घेत नाही आहे. चित्रपट प्रदर्शित होताच संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी सर्वात पहिले आक्षेप घेतला होता. त्यांनी चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली असल्याचे संगितले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमीं आणि शिवभक्तांनी देखील या चित्रपटाचा विरोध केला होता. तर आता हा चित्रपट झी मराठी वाहिनीवरून (zee marathi) प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद सुरु झाला आहे. या संदर्भात कोल्हापुरातील शिवभक्तांनी अभिनेते सुबोध भावेंची (Subodh Bhave) भेट घेतली होती.त्यावर सुबोध भावे यांनी यापुढे कधीही ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काम करणार नाही असे जाहीर केलं आहे.

हर हर महादेव चित्रपटाचा वाद अजून तीव्र होत होता. तसेच संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी देखील या चित्रपटाचा जोरदार विरोध केला होता.चित्रपटात दाखवण्यात आलेल्या चुकीच्या गोष्टी पुन्हा बदलाव्यात आणि खरा इतिहास दाखवावा. पण हर हर महादेव या चित्रपटातील चित्रणात बदल करण्यात आलेला नाही. आणि हा चित्रपट आता झी मराठी (zee marathi) वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या संदर्भात कोल्हापुरातील काही शिवभक्तांनी अभिनेते सुबोध भावेंची भेट घेतली. यावेळेस सुबोध भावे यांनी “यापुढे कधीही ऐतिहासिक चित्रपटातील भूमिका साकारणार नाही ” असे जाहीर केले आहे.

अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी भेट घायला आलेल्या शिवभक्तांना सांगितलं की “माझं महाराजांवरील प्रेम आयुष्यभर राहील. त्यांच्या चित्रपटातून मला जे काही मिळालं आहे. ते मी मरेपर्यंत करत राहणार. परंतु, पण इथून पुढे ऐतिहासिक चित्रपटातील कोणाचीही भूमिका बापजन्मात करणार नाही. आता शुटिंग सुरू असलेल्या शेवटचा बायोपिक सिनेमा असेल,” असे सुबोध भावे यांनी जाहीर केल आहे.

हे ही वाचा : 

Winter Assembly Session हिवाळी अधिवेशन गाजणार, सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे येणार आमनेसामने

Christmas 2022 BTS मेंबर V चे ‘Christmas tree’ गाणं लोकांना घालतेय भुरळ, पण या गाण्यामागे दडलेली कथा माहीत आहे का तुम्हाला?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version