ससुराल सिमर का फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

शोएब इब्राहिम बेबीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दीपिका आणि तो एकत्र बसले आहेत, दोघांनी पांढरे कपडे घातले आहेत.

ससुराल सिमर का फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

टीव्हीचे सर्वात लोकप्रिय जोडपे दीपिका ककर आणि शोएब इब्राहिम लग्नाच्या पाच वर्षानंतर आई-बाबा होणार आहेत. शोएब इब्राहिम इंस्टाग्रामवर पत्नी दीपिका (Dipika Kakar Pregnant) गर्भवती असल्याची बातमी खास सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर केली आहे. फोटो शेअर करत शोएबने यावेळी सर्वात सुंदर असे वर्णन केले आहे.

शोएबने काय म्हंटले?

शोएब इब्राहिम बेबीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दीपिका आणि तो एकत्र बसले आहेत, दोघांनी पांढरे कपडे घातले आहेत. दीपिका आणि शोएब यांनी डोक्यावर टोपी घातली आहे, ज्यावर आई आणि बाबा असे लिहिले आहे. शोएबने फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ही बातमी तुम्हा सर्वांसोबत आनंदाने, कृतज्ञतेने, उत्साहाने आणि थोड्या अस्वस्थेत शेअर करत आहे. हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा आहे… होय. आम्ही लवकरच आमच्या पहिल्या मुलाचे पालक होणार आहोत. लवकरच आम्ही पालक होऊ. आमच्या लहान बाळासाठी तुमचे खूप प्रेम आणि प्रार्थना आवश्यक आहेत.

दीपिका आणि शोएबची प्रेमकहाणी

‘ससुराल सिमर’ या टीव्ही मालिकेतून दीपिका ककरला घरोघरी ओळख मिळाली आहे. या मालिकेच्या सेटवर शोएब इब्राहिमचे आणि दीपिकाचे प्रेमही फुलले आणि पुढे जाऊन त्यांनी लग्नही केले. या मालिकेत दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. शोएब इब्राहिमसोबत दीपिकाचे हे दुसरे लग्न आहे, याआधी दीपिकाने रौनक मेहतासोबत लग्न केले होते.

हे ही वाचा:

अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांचा सिनेमा सृष्टीतील प्रवास तुम्हाला माहित आहे का ? घ्या जाणून

स्वतः शाहरुख खान याने मानले तरुणांचे आभार , पहा नेमकं काय झाले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version