spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sulochana Chavan रसिक प्रेक्षकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांचा गायन प्रवास

६ दशकाहून अधिक काळ गात रसिक प्रेक्षकांच्या हृदयात मानाचं स्थान मिळवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती.

Sulochana Chavan : ६ दशकाहून अधिक काळ गात रसिक प्रेक्षकांच्या हृदयात मानाचं स्थान मिळवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज शनिवार १० डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा :  Sulochana Chavan passes away जेष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

सुलोचना चव्हाण यांचा जन्म मुंबईत १७ मार्च १९३३ साली झाला. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी गायनाला सुरुवात केली. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता श्रीकृष्ण बाळमेळा. याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनी सुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीत त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहीण स्वतः कला क्षेत्रात नव्हती. परंतु सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. असे असले तरी, सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करत असे. त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली आणि त्यामुळेच त्यांची ही कला चिरकालीन टिकावी अशीच निर्माण केली आहे.

सुलोचना चव्हाण यांनी पहिलं गाणं कोणतं गायलं?

‘कृष्ण सुदामा’ या सिनेमासाठी सुलोचना चव्हाण यांनी पहिल्यांदा गाणं गायलं. त्यावेळी त्या फक्त नऊ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्यांनी मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर या आघाडीच्या गायकांसोबत गायला सुरुवात केली. मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तमिळ, पंजाबी अशा अनेक भाषांत त्यांनी आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे.

सुलोचना चव्हाण यांची गाजलेली गाणी – 

१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची
२. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
३. पाडाला पिकलाय आंबा
४. फड सांभाळ तुर्‍याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा
५. कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा
७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?
८. स्वर्गाहुन प्रिय आम्हाला आमचा सुंदर भारत देश, आम्ही जरी एक जरीही नाना जाती नाना वेष
९. मी बया पडली भिडंची, गाव हे हाय टग्याचं
१०. मल्हारी देव मल्हारी
११. नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी
१२. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा
१३. गोरा चंद्र डागला
१४. मला म्हणत्यात पुण्याची मैना
१५. पावना पुण्याचा आलाय गं

 

हे ही वाचा : 

४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उदघाटनात उद्धव ठाकरेंनी साधला सत्ताधारी पक्षांवर निशाणा

वसंत मोरेंनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट, पक्ष सोडण्याच्या चर्चेवर पूर्णविराम

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss