spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘वेड’ सिनेमातील ‘बेसुरी’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा (Genelia Deshmukh) या जोडीची कायमच चर्चा होत असते.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा (Genelia Deshmukh) या जोडीची कायमच चर्चा होत असते. दोघांनी तुझे मेरी कसम या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जिनिलिया डिसुझाने याआधी हिंदी, तेलगू, तमिळ व कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडची ही लाडकी मराठमोळी जोडी आता मराठीत एका चित्रपटातून समोर येत आहे. हे दोघेंनी त्यांच्या आगामी ‘वेड’ (Ved) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून जेनेलिया मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. आता या सिनेमातील ‘बेसुरी’ (Besuri) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

 ‘वेड’ या सिनेमाचं पोस्टर, टीझर आणि टायटल सॉंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. आता या सिनेमातील ‘बेसुरी’ हे गाणंदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘बेसुरी’ या गाण्याच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलियाने संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यांनी देश म्युझिक नावाने म्युझिक लेबल सुरू केलं आहे. या लेबल अंतर्गत हे पहिलं गाणं आज रिलीज करण्यात आलं आहे.

‘बेसुरी’ हे गाणं गीत वसुंधरा वी यांनी गायले आहे. तर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. मुंबई फिल्म कंपनीने देश म्युझिक लेबलद्वारे हे गाणं रिलीज केलं आहे. ‘बेसुरी’ या रोमॅंटिक गाण्यात रितेश आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत आहेत. रितेशने हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. गाण्याचा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,”आकर्षणातुन जडतं ते प्रेम आणि प्रेमातल्या वेडेपणात घडतं ते समर्पण”.

‘वेड’ या सिनेमात जेनेलिया आणि रितेशसह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या ३० डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे .ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ , विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत . तर गीते अजय – अतुल , गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. वेड चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत . सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे. संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत. जिनिलिया देशमुख यांनी वेड चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हे ही वाचा : 

‘सामना’तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी सोडले टीकास्त्र, ४० आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बेइमानी केली

World Soil Day 2022 ‘जागतिक मृदा दिन’ ५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss