बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘देवा देवा’ गाणं झाले प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या दोघांची जोडी हि सध्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘देवा देवा’ गाणं झाले प्रदर्शित

बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'देवा देवा' गाणं झाले प्रदर्शित

मुंबई :- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या दोघांची जोडी हि सध्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘देवा देवा’ (Deva Deva) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तर त्या आधी याच चित्रपटातील अरिजित सिंग (Arijit Singh) यांनी गायलेले सुप्रसिद्ध ‘केसरिया’ (Kesariya) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं

‘देवा देवा’ हे गाणं अरजीत सिंह आणि जोनिता गांधी यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. तर प्रीतमने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. ‘केसरिया’ या गाण्याप्रमाणेच ‘देवा देवा’ हे गाणं सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर ‘देवा देवा’ मध्ये रणबीर देवाच्या भक्तीत तल्लीन झालेला पाहायला मिळणार आहे. या गाण्यात रणबीर आगीसोबत खेळताना दिसत आहे. तसेच या गाण्यांबाबत आलिया भट्ट हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या गाण्याच्या शेवटी आलिया-रणबीरचा रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर सध्या हे गाणं व्हायरल होत आहे. अरजीत सिंहच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना आवडत आहे.

हे ही वाचा :-

पंतप्रधान ओबीसी समाजाचा असूनही 8 वर्षात समाजाला काय मिळाले? नाना पटोलेंचा सवाल

Exit mobile version