‘राडा’ सिनेमातील ‘मोरया मोरया’ गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीस

गणरायाला वंदन करणारे हे 'मोरया मोरया' गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करेलच यांत शंकाच नाही

‘राडा’ सिनेमातील ‘मोरया मोरया’ गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीस

अलीकडेच दक्षिणी सिनेमाशी ज्याची तुलना केली गेली होती अशा ‘राडा’ सिनेमाचे पहिले वहिले गणरायाला साद घालणारे ‘मोरया मोरया’ गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. गणरायाच्या सणावर आधारित असणारे चित्रपटातील हे गाणे आजच्या या शुभदिनी प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. राम शेट्टी निर्मित ‘राडा’ या सिनेमातील ‘मोरया मोरया’ हे गाणे जाफर सागर लिखित असून गायक जसराज जोशी आणि मधुर शिंदे यांनी त्यांच्या सुमधुर आणि दमदार आवाजात हे गाणे स्वरबद्ध केले आहे. तर संगीतकार दिनेश अर्जुना यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यातील नृत्य फुलवा खामकर यांनी कोरियोग्राफ केले आहे.

राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प – पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड, योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांना पाहणे रंजक ठरणार आहे. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. तर हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

गणरायाला वंदन करणारे हे ‘मोरया मोरया’ गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करेलच यांत शंकाच नाही. येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ‘मोरया मोरया’ गाण्याचा धुमाकूळ घालणारा ‘राडा’ हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

गणेशोत्सवामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला माहित आहे का?

जंगकूकच्या वाढदिवशी, बीटीएस मेंबर व्ही आणि जंकूकच्या भांडणाचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version