पडद्यावरची ‘गोड आजी’ हरपली, ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा नवाथे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८९ वर्षांच्या होत्या. पन्नासच्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीवर या आजींची अधिराज्य गाजवले आहे.

पडद्यावरची ‘गोड आजी’ हरपली, ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा नवाथे (Actress Rekha Navathe) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८९ वर्षांच्या होत्या. पन्नासच्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीवर या आजींची अधिराज्य गाजवले आहे. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड (Mulund)  येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

चित्रा नवाथे यांचे खरं नाव कुसुम सुखटणकर (Kusum Sukhtankar) होते. दादरला मिरांडा चाळीत त्या राहत होत्या. कुसूम आणि कुमूद सुखटणकर या बहिणींनी १९४५ च्या दरम्यान मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते. एक बालकलाकार म्हणून त्यांनी त्यावेळी भूमिका करायला सुरुवात केली होती. नंतर गदिमांनी कुसुम यांचे नाव बदलून चित्रा असे ठेवले होते. या दोघी बहिणींमध्ये कुमुद सुखटणकर म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत या थोरल्या तर कुसुम सुखटणकर म्हणजे अभिनेत्री चित्रा नवाथे या धाकट्या होत्या. या दोघी बहिणींनी मराठी चित्रपट सृष्टीत सुवर्ण काळ गाजवला आहे.

‘लाखाची गोष्ट’ (Lakhachi Gosht), ‘वहिनीच्या बांगड्या’ (Vahinichya Bangdya), ‘गुळाचा गणपती’ (Gulacha Ganpati),  ‘बोलविता धनी’, ‘उमज पडेल तर’, ‘राम राम पाव्हणं’ ते गेल्या दशकात गाजलेल्या ‘टिंग्या’ अशा अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. या दोन्ही बहिणींचा १९५२ साली प्रदर्शित झालेला राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ यात नायिका म्हणून पहिला चित्रपट होता. प्रसिद्ध दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी चित्रा यांचा विवाह झाला होता. अलीकडच्या काळात त्यांनी ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबंब’ (Agadbamb) या चित्रपटात काम केले होते. ‘टिंग्या’ (Tinghya) हा चित्रपट त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी केला होता.

हे ही वाचा:

Golden Globes 2023 Winners List, सातासमुद्रा पार होणार भारतीय चित्रपटाचा सन्मान

पडद्यावरची ‘गोड आजी’ हरपली, ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version