महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या प्रदर्शना बरोबरच केदार शिंदेच्या “बाईपण भारी देवा” या आगामी चित्रपटाचा टिझर झाला रीलीज

'बाईपण भारी देवा' आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे.

महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या प्रदर्शना बरोबरच केदार शिंदेच्या “बाईपण भारी देवा” या आगामी चित्रपटाचा टिझर झाला रीलीज

‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.

या चित्रपटाचा टीझर एका खास मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. आज २८ एप्रिल रोजी, केदार शिंदे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ महाराष्ट्रभरात रिलीज झाला असुन त्यांचाच आगामी बहुचर्चित चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ याचा टिजर ही आज एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे.

जिओ स्टुडियोजचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा आता तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात उडवलेली धमाल अनुभवायला!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. सिनेमाचं नाव जसं भारी भरकम आहे तशीच सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.

हे ही वाचा : 

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ, काय आहेत अपघाताची नेमकी कारणं?

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version