राजकारण आणि क्राइमची सांगड घालणारा ‘महाराणी २’ सीरिजचा ट्रेलर आऊट

राजकारण आणि क्राइमची सांगड घालणारा ‘महाराणी २’ सीरिजचा ट्रेलर आऊट

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीनं मोठ्या पडद्याबरोबरच ओटीटीवर देखील विशेष स्वतःची अशी विशेष ओळख निर्माण केली आहे. तिच्या ‘महारानी’ या सीरिजला प्रेक्षकांची पसंती दिली. गेल्या वर्षी या सीरिजचा पहिला सिझन रिलीज झाला होता. आता या सीरिजचा आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. महारानी२ ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत, आता या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील हुमाच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सीरिजमध्ये राजकारण आणि क्राइम या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत, असं ट्रेलर पाहून कळत आहे.

हेही वाचा : 

लिगर मध्ये ‘विजय देवरकोंडा’ चमकला पण, पुरी जगन्नाध चित्रपट चाहत्यांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला

महाराणी २ मध्ये बिहारच्या मुख्यमंत्री राणी भारती ( हुमा कुरेशी ) यांना केवळ राजकीय प्रतिस्पर्धी नवीन कुमार (अमित सियाल) यांच्याकडूनच नव्हे तर तिच्या पतीपासून शत्रू झालेल्या भीमा भारती (सोहम शाह) यांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. आरक्षण, वेगळ्या झारखंड राज्याची मागणी आणि राणी आणि बिहार या दोघांनाही धक्का देणारे बलात्कार आणि खून यांतून हा त्रिपक्षीय संघर्ष कसा उलगडतो याची कथा आहे. कुप्रसिद्ध शिल्पी-गौतम हत्या, राजीव गोस्वामी आत्मदहन प्रकरण आणि राजकीय साधने म्हणून जात आणि धर्मावर भाष्य असे संदर्भ आहेत.

महारानी या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये रानी भारती या सर्वसामान्य गृहिणीचा राजकारणी होण्याचा प्रवास दाखवण्यात आला होता. आता या दुसऱ्या सिझनमध्ये रानी भारतीचा धाकड अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ट्रेलरमधील हुमाच्या ‘ये नया बिहार है’ या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले.

मुंबईत हाय अलर्ट; गेट वे ऑफ इंडिया आता पर्यटकांसाठी बंद

Exit mobile version