शाहरुख खानच्या ‘जवान’चा ट्रेलर झळकणार बुर्ज खलिफावर…

बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

शाहरुख खानच्या ‘जवान’चा ट्रेलर झळकणार बुर्ज खलिफावर…

बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ३१ ऑगस्टला या सिनेमाचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी किंग खानने ‘जवान’चा ट्रेलर बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) रिलीज होणार असल्याचं ट्वीट केलं होतं. त्याप्रमाणे काल (३१ ऑगस्ट २०२३) ‘जवान’चा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकला. ‘जवान’चा बुर्ज खलिफावर झळकलेल्या ट्रेलरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खान फॅन क्लबनेदेखील (Shah Rukh Khan Fan Club) हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बुर्ज खलिफावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून चाहत्यांची उत्सुकता आसमानात पोहोचली आहे.

२०२३ मधला शाहरुख खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी त्याचा ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. एटली कुमार दिग्दर्शित (Directed by Atlee Kumar) ‘जवान’ हा सिनेमा ०७ सप्टेंबर २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख आणि एटली कुमारने पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. ‘जवान’ या सिनेमात शाहरुख खानसह नयनतारा, योगी बाबू, रिद्धी डोगरा आणि सुनील ग्रोवर, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच दीपिका पदुकोणही (Deepika Padukone) या सिनेमात दिसणार आहे.

शाहरुख खानचा ‘जवान’ हा सिनेमा पॅन इंडिया हा सिनेमा आहे. या सिनेमात शाहरुखचे वेगवेगळे लूक दिसणार आहेत. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतही (America) आतापर्यंत या सिनेमाचे १२३४० तिकीट विकले गेले आहेत. अमेरिकेत हा सिनेमा ४३१ स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. गौरी खान आणि शाहरुखच्या रेड चिलीजच्या बॅनर अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. शाहरुखचा ‘जवान’ सिनेमा ‘पठाण’चा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो, असे म्हटले जात आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा १२५ कोटींची कमाई करू शकतो. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा: 

१ सप्टेंबर पासून मुंबईमध्ये दुधाच्या दरात होणार एवढ्या रुपयांनी वाढ

Asia Cup 2023, श्रीलंकेचा बांगलादेशवर ५ विकेट्सने विजय…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version