spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस…

लग्नानंतर अनेक महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात इतक्या व्यस्त होतात की, त्यांच्या आवडी-निवडी विसरतात.

लग्नानंतर अनेक महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात इतक्या व्यस्त होतात की, त्यांच्या आवडी-निवडी विसरतात. अशाच एका महिलेची कथा अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही ‘सुखी’ (Sukhee) या चित्रपटाच्या माध्यमातून मांडणार आहे. शिल्पाच्या सुखी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, एक महिला तिच्या कुटुंबाला सुखी ठेवतोय, पण तिला स्वतःच्या सुखाचा विसर पडला आहे. सुखी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, एक महिला लग्नापूर्वी धाडसी आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगते, पण लग्नानंतर घर सांभाळणे हे तिचे पहिले कर्तव्य होते. शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

सुखी चित्रपटाच्या २ मिनिटे १६ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये शिल्पा शेट्टी ही एका गृहिणीच्या भूमिकेत दिसत आहे. जी तिचा नवरा आणि मुलांची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळते. त्यानंतर अनेक वर्षांनी तिला कळते की तिच्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणींचे रीयूनियन (Reunion) होणार आहे. या रीयूनियनमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना सुखी चित्रपट बघावा लागेल. सुखी हा चित्रपट २२ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत कुशा कपिला (Kusha Kapila) देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कुशानं या चित्रपटात सुखीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. याशिवाय कुशा भूमी पेडणेकरच्या (Bhumi Pednekar) आगामी थँक यू फॉर कमिंग (Thank you for coming) या चित्रपटातही दिसणार आहे. जो सुखी नंतर काही दिवसांनी ०६ ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

धडकन, मैं खिलाडी तू अनाडी, बाजीगर या चित्रपटांमधून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीस आली. शिल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ (Indian Police Force) या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. शिल्पाचा काही महिन्यांपूर्वी निकम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता शिल्पाच्या ‘सुखी’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. शिल्पा ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. आता शिल्पाच्या सुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल का नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा: 

महाराष्ट्र सरकारचा कुणबी-मराठा आरक्षणाचा निघाला जीआर

Dahi Handi 2023, आज दहीहंडीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या अदाने केलं सर्वांना घायाळ…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss