”तमाशा”चा ट्रेलर ठरतोय चर्चेत

तमाशा या मराठी चित्रपटाची अनेक दिवसांपासून याची चर्चा आहे. या चित्रपटाचे नावच इतके निराळे आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते.

”तमाशा”चा ट्रेलर ठरतोय चर्चेत

तमाशा या मराठी चित्रपटाची अनेक दिवसांपासून याची चर्चा आहे. या चित्रपटाचे नावच इतके निराळे आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक दिसत आहे. ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या १५ जुलै रोजी हा भव्य चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरही प्रेक्षकांना आवडत असल्याचं दिसून येत आहे. यात सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत आहेत. व्यावसायिक कारकिर्दीत आपण किती वरचढ आहोत, हे दाखवण्यात त्यांची चढाओढ सुरु असून त्यात ‘ब्रेकिंग न्यूज’साठीची त्यांची धडपड, एकमेकांबद्दल असलेली ईर्षा यात अधोरेखित होत आहे. यात सिद्धार्थ आणि हेमांगीही महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारी गाणी कथा पुढे नेणारी आहेत. त्यामुळे या चित्रपटात काहीतरी वेगळे पाहायला मिळणार असल्याचे दिसतेय.

‘तमाशा लाईव्ह’च्या निमित्ताने सोनाली, सचित, सिद्धार्थ यांनी गायकाची भूमिकाही साकारली आहे. आधुनिक विषय असलेला हा एक संगीतमय चित्रपट असून प्रत्येक गाण्यात वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत.  त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहे. या चित्रपटाचे संगीत अमितराज व पंकज पडघन यांचे असून गाण्यांचे बोल क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. उमेश जाधव यांचे ‘तमाशा लाईव्ह’ला नृत्य दिग्दर्शन लाभले आहे.

Exit mobile version