‘Dhishkyaoon’ चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस

‘Dhishkyaoon’ चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस

मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबचे (Prathamesh Parab) चाहते गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा ‘ढिशक्यांव’ (Dhishkyaoon) या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर (Umesh Vitthal Mohalkar) आणि प्रितम एस के पाटील (Pritam Sk Patil) निर्मित तर ‘फिल्मस्त्र स्टुडिओ’ आणि ‘झटपट फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ढिशक्यांव’ हा चित्रपट १० फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे.

अभिनेता प्रथमेश याच्या चित्रपटांची चर्चा हि सर्वत्र होत असते. प्रथमेश परब याने टाइम पास , तडका, उर्फी अशा अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तर आता प्रथमेश पारंबच्या आगामी चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. नुकताच प्रथमेश परब अभिनीत ‘ढिशक्यांव’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला आहे . प्रथमेश परब आणि लातूरच्या अहेमद देशमुखने यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘फिल्मस्त्र स्टुडिओ’ आणि ‘झटपट फिल्म प्रॉडक्शन’ हे ‘ढिशक्यांव’ या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर राजीव पाटील, राहुल जाधव आणि उमाकांत बरदापुरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद हे लेखक संजय नवगिरे यांनी लिहिले आहे. प्रथमेश परब सोबत या चित्रपटात संदीप पाठक, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे या कलाकारांना पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता संदीप पाठक आणि सुरेश विश्वकर्मा यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. सुरेशजींनी कमाल व्यक्तिरेखा साकारत चित्रपटाची शोभा वाढवलीय.

‘ढिशक्यांव’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहता लक्षात येत की प्रथमेश परब हा या चित्रपटात ऍक्शन मोडमध्ये दिसणार आहे. तसेच नेहमी प्रमाणेच प्रथमेश परब हा या चित्रपटातही प्रेमात पडणार आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हे ही वाचा:

मुसळधार बर्फवृष्टीत भारत जोडो यात्रेची सांगता

मुसळधार बर्फवृष्टीत भारत जोडो यात्रेची सांगता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version