लग्नाची पत्रिका आली, इथे करणार जश्न -ए- शादी

काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी देखील उपस्थिती लावल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर परिणीती आणि राघव चढ्ढा यांना नेटकऱ्यांनी लग्नाच्या तारखेवरुन प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाची बातमी आता समोर आली आहे.

लग्नाची पत्रिका आली, इथे करणार जश्न -ए- शादी

काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी देखील उपस्थिती लावल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर परिणीती आणि राघव चढ्ढा यांना नेटकऱ्यांनी लग्नाच्या तारखेवरुन प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाची बातमी आता समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या लग्नाची तारीख आणि स्थळ याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते.गेल्या काही महिन्यांपूर्वी परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा झाला होता. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींपेक्षा राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी जास्त गर्दी केली होती.

आता तर सोशल मीडियावर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची पत्रिका नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावरुन वेगवेगळया चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीमध्ये त्यांचा साखरपूडा पार पडला होता. त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. यावेळी परिणीतीची बहिण हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा अमेरिकेतून आली होती. यावेळी तिचा पती निक जोनास देखील हजर होता.आता परिणीतीच्या लग्नाच्या पत्रिकेनं नेटकऱ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली आहेत. त्यात लग्न केव्हा, कुठे आणि किती वाजता आहे हे सांगून टाकलं आहे. परिणीती आणि राघव हे येत्या ३० सप्टेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. ते चंदीगडमधील ग्रँड ताज हॉटेलमध्ये लग्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आम्ही चढ्ढा कुटूंबीय आपल्या सर्वांना त्या ग्रँड वेडिंगसाठी निमंत्रित करतो आहोत. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघव चढ्ढा हे पंजाबी पद्धतीनं लग्न करणार आहेत. ते राजस्थानमध्ये २३ आणि २४ डिसेंबर रोजी पंजाबी रीतिरिवाजानुसार लग्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्री वेडिंग कार्यक्रम हे २३ डिसेंबर रोजी होणार आहे. २४ डिसेंबर रोजी ते राजस्थानमधील उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा: 

पुण्यातील हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी केली मोठी कारवाई

दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समुदायाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version