Tuesday, September 24, 2024

Latest Posts

2025 हे वर्ष मनोरंजनाने भरलेले असेल, ‘लाहोर 1947’ ते ‘वॉर 2’ पर्यंत… बहुप्रतिक्षित चित्रपटांचा खजिना येणार भेटीस…

2024 मध्ये आतापर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हृतिक रोशनच्या 'फाइटर'पासून 'स्त्री 2' सारख्या मोस्ट अवेटेड सिक्वेलपर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Upcoming Movies 2025 : 2024 मध्ये आतापर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हृतिक रोशनच्या ‘फाइटर’पासून ‘स्त्री 2’ सारख्या मोस्ट अवेटेड सिक्वेलपर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता 2025 हे वर्ष देखील मनोरंजनाने भरलेले असणार आहे कारण या वर्षी अनेक सुपरस्टार्सचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. या यादीत सनी देओलचा ‘लाहोर 1947’ ते अजय देवगणच्या ‘रेड 2’चा समावेश आहे.

लाहोर 1947
सनी देओलने 2023 मध्ये आलेल्या ‘गदर 2’ चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केले आहे. आता लोक आमिर खान निर्मित ‘लाहोर 1947’ या चित्रपटाची वाट पाहत आहेत. सनी देओल तसेच प्रीती झिंटा आणि करण देओल स्टारर चित्रपट ‘लाहोर 1947’ 2025 मध्ये थिएटरमध्ये येण्यासाठी सज्ज आहे.

स्काय फोर्स
ॲक्शन पॅक्ड एरियल वॉरवर आधारित चित्रपट ‘स्काय फोर्स’ त्याच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे. अक्षय कुमार स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर आणि संदीप केवलानी करत आहेत. हा चित्रपट आधी ऑक्टोबर 2024 मध्ये रिलीज होणार होता परंतु आता 2025 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त तो चित्रपटगृहात येऊ शकतो.

Raid 2:
अजय देवगणचा 2018 मध्ये आलेला Raid हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. अशा परिस्थितीत चाहते त्याच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी बातमी आली होती की ‘रेड 2’ या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. पण नंतर निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट पुढे ढकलली आणि आता हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होईल.

जॉली एलएलबी 3
कोर्टरूम ड्रामा ‘जॉली एलएलबी’चे दोन्ही भाग प्रेक्षकांना आवडले. आता तिचा तिसरा सिक्वेल पाहण्यासाठी चाहत्यांचे डोळे लागले आहेत. ताज्या अपडेट्सनुसार, ‘जॉली एलएलबी 3’ पुढील वर्षी 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होऊ शकतो.

सनी संस्कारी तुलसी कुमारी:
वरुण धवन आणि जान्हवी कपूर ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’मध्ये धमाल करणार आहेत. या चित्रपटात मनीष पॉल, अक्षय ओबेरॉय आणि सान्या मल्होत्रा ​​देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 18 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss