Red Sea International Film Festival मध्ये या बॉलीवूड अभिनेत्याचा होणार विशेष पुरस्कार

Red Sea International Film Festival मध्ये या बॉलीवूड अभिनेत्याचा होणार विशेष पुरस्कार

अभिनेता शाहरुख खानला बॉलीवूडमध्ये कर्यरत राहून बरीच वर्ष झाली आहे. शाहरुख खानचे चाहते संपूर्ण जगभरात विखुरलेले आहेत. एवढेच नाही शाहरुख खान हा जगातील सर्वश्रीमंत अभिनेत्यांमध्ये ५व्या क्रमांकावर आहे. नुकताच शाहरुख खानला ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये (Red Sea IFF) शाहरुखला सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ हा सौदी अरेबियात पार पडणार आहे. जगभरातील अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. म्हणूनच या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सिनेप्रेमी आणि सेलिब्रिटीसुद्धा खूप आतुर असतात. तसेच ६१ देशांच्या १३१ फीचर आणि शॉर्ट फिल्मचं या पुरस्कार सोहळ्यात स्क्रीनिंग होणार आहे. सिनेसृष्टीत केलेल्या मोठ्या योगदानामुळे शाहरुख खानला ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. बॉलीवूडमधील शाहरुखच्या प्रवासाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या चार दशकांहून अधिक काळ तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहरुख खानला दुबईत सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी ग्लोबल आयकॉनने सन्मानित करण्यात आले होते.तर आता रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’च्या सीईओनी यावर सांगितल आहे की ,”जागतिक सुपरस्टार आणि एक उत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आज शाहरुख खान सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे आता डिसेंबरमध्ये त्याला भेटण्याची ते खूप उत्सुक आहेत”.

शाहरुख खानचा आगामी ऍक्शन चित्रपट पठाण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमात तो दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. अलीकडेच शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाच्या ट्रेलर मुले या चित्रपटाचे व्ही एफ एक्सची चर्चा सुरु होती. तर शाहरुख खान याने सांगितल होत की त्याने पठाण या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे त्यामुळे त्याने पठाण हा चित्रपट हितच जाणार याची खात्री दर्शवली होती .

भूकंपाच्या धक्क्यांनी इंडोनेशिया हादरलं, मृतांचा आकडा ४० वर

भूकंपाच्या धक्क्यांनी इंडोनेशिया हादरलं, मृतांचा आकडा ४० वर

Exit mobile version