Malaika Arora च्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री? पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

अभिनेत्री मलायका अरोरा (Actress Malaika Arora) तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चांगली चर्चेत असते.

Malaika Arora च्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री? पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा (Actress Malaika Arora) तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चांगली चर्चेत असते. मलायकाने लग्नाच्या तब्बल १९ वर्षांनंतर अभिनेता अरबाज खान (Actor Arbaaz Khan) याला घटस्फोट (Divorce) दिला. त्यानंतर अभिनेत्री मालयकाच्या आयुष्यात दुसऱ्या पुरुषाची एन्ट्री झाली. हा दुसरा पुरुष म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका अभिनेता अर्जुन कपूर (Actor Arjun Kapoor). हे दोघेही एकमेकांना बरेच दिवस डेट करत होते. परंतु आता अर्जुन याच्यासोबत देखील मलायकाचं ब्रेकअप झाल्याची चर्चा तुफान चालू आहे. ब्रेकअपच्या चर्चा तुफान रंगल्यानंतर मलायका हिने मिस्ट्री मॅनसोबत फोटो पोस्ट केला होता. ज्यामुळे अभिनेत्रीच्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री झाली अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगली. दरम्यान, मलायकाने पुन्हा एक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे.

अभिनेता अर्जुन कपूर देखील गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर करत आहे. त्यामुळे मलायका – अर्जुन यांचं नातं कोणत्या वळणावर आहे. याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही. नुकताच अर्जुन कपूर याचा वाढदिवस झाला. वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्याच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती. पार्टीत अनेक सेलिब्रिटी दिसले परंतु अभिनेत्री मलायका अरोरा मात्र दिसली नाही. शिवाय मलायका हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुन याला शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून मलायका – अर्जुन यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन – मलायका यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

 

मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘प्रत्येक आनंद… प्रेमळ शब्द… प्रत्येक प्रकारचं कार्य आपल्या आत्म्याच्या सौंदर्याचं प्रतिबिंब आहे.’ सध्या मलायका हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्टच्या माध्यमातून मलायका काय सांगू इच्छिचे हे फक्त तिलाच माहिती… अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

हे ही वाचा:

Pune Monsoon Updates: दुर्घटना टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, Ajit Pawar यांचे नागरिकांना आवाहन

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version