spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

या अभिनेत्रीने अभिनयक्षेत्राला कायमचा ठोकला राम राम

मालिकेत दिवसेंदिवस आता ट्विस्ट वाढत चाललंय पण यातच आता नंदिनीचं पात्र साकारणारी मराठ मोळी अभिनेत्री अनघा भोसले हिने कायमस्वरूपी अभिनयाला राम राम केला आहे.

स्टार प्लस हिंदी वाहिनीवरील अनुपमा ही मालिका प्रेक्षकांना बरीच आवडते.मालिकेतील सगळ्याच पत्रांनी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतले आहे.मालिकेत दिवसेंदिवस आता ट्विस्ट वाढत चाललंय पण यातच आता नंदिनीचं पात्र साकारणारी मराठ मोळी अभिनेत्री अनघा भोसले हिने कायमस्वरूपी अभिनयाला राम राम केला आहे.गेल्या काही दिवसांपासून ती मालिकेत दिसत नसल्याने चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तिच्याविषयी चिंता व्यक्त केली. त्यानंतर आता खुद्द अनघाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित अभिनयक्षेत्र सोडल्याचं जाहीर केलं.अनघा श्री कृष्णाची मोठी भक्त आहे हेच कारण देत तिने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं.

‘माझ्या या निर्णयाचा तुम्ही आदर करावा आणि माझी साथ द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे’, असंही तिने या पोस्ट मध्ये सांगितले.हरे कृष्ण.. मी अनुपमा या मालिकेत दिसत नसल्यानं तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली हे मला माहितीये. मला भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार. ज्यांना माहित नाही, त्यांना मी या पोस्टद्वारे कळवू इच्छिते, मी फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे. माझ्या या निर्णयाचा तुम्ही आदर करावा आणि माझी साथ द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे. मी अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यात्माविषयी असलेल्या श्रद्धांमुळे मी हा निर्णय घेतला आहे. तुम्ही सगळे आपआपले कर्म करत राहाल आणि जे तुम्हाला भगवान श्रीकृष्णापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांच्यापासून स्वत: दूर व्हाल हे मला माहित आहे’, असं तिने लिहिलंय.

तिच्या अनेक सहकलाकारांनी तिच्या पोस्ट वर कमेंट्स केल्या आहेत.मालिकेत वनराजची भूमिका साकारणाऱ्या सुधांशू पांडेनं लिहिलं, ‘ही तुझी खरी इच्छा आहे, या प्रवासाचा आनंद घे’. तर मालिकेत अनघाचा प्रियकर समरची भूमिका साकारणाऱ्या पारस कलनावतने लिहिलं, ‘खूश राहा’. अभिनेत्यांसह तिच्या चाहत्यांनी देखील तिला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.तर आता नदिनी चं पात्र कोणती अभिनेत्री साकारणार हा प्रश्न अनेक चाहत्यांसमोर निर्माण झाला आहे.पण मालिकेत लवकरच नविन नंदिनीची एन्ट्री होणार आहे.

Latest Posts

Don't Miss