अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ने बनवली स्वतःची साडी

लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे उर्मिला निंबाळकर.सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेली उर्मिला सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन व्हिडीओ शेअर करत असते.

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ने बनवली स्वतःची साडी

लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे उर्मिला निंबाळकर.सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेली उर्मिला सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन व्हिडीओ शेअर करत असते. यात अनेकदा ती तिच्या जीवनातील काही अपडेट्सही चाहत्यांना देते. उर्मिला ही एक यशस्वी अभिनेत्री असून तिने स्वतःचं युट्युब चॅनल सुरु केलं असून त्यावर ती अनेक व्हिडीओज शेअर करत असते.तिच्या व्हिडिओमध्ये  फॅशन लुकमध्ये ती कायमच वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. असाच एक आगळा वेगळा विडिओ तीने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

तिच्या या खास व्हिडिओमध्ये तिने साडी स्वतः बनवली आहे. आता एरवी बाजारात मिळणाऱ्या साड्या तर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. पण कधी त्याचा रंग हवा तसा नसतो, कधी डिजाईन तर कधी आपल्या मनासारखी साडी शोधणं हे देवाला शोधण्यापेक्षा सुद्धा कठीण होऊन जातं. म्हणूनच बजेटमध्ये आपल्या आवडीची, आपल्या कम्फर्टप्रमाणे साडी कशी निवडावी याबद्दल व्यवस्थित माहिती देणारा तिचा हा विडिओ लवकरच चॅनलवर येणार आहे. या व्हिडिओची एक खास झलक तिने शेअर केली असून यात तिने अगदी अप्रतिम असा रेट्रो लुक तयार केला आहे.

ब्लॅक अँड व्हाईटच्या रेट्रो स्टाईलने  टिपिकल सुंदर साडीमधले लुक असत तसाच लुक तिने रिक्रिएट केला आहे. त्यासोबत काळी छत्री घेऊन ‘प्यार हुआ एकरार हुआ’ गाण्यावर उर्मिला मस्त डान्स करताना दिसतेय.ही साडी गडद लाल रंगाची असुन त्यावर ब्लॅक रंगाची बॉर्डर आहे.तिने बनवलेली साडी चाहत्यांना प्रचंड आवडली असून चाहत्यांनी पोस्ट ला लाईक आणि कमेंट्स चा वर्षाव केला आहे.

Exit mobile version