रणवीरने न्यूड फोटोशूट प्रकरणात दिले हे स्पष्टीकरण

रणवीरने न्यूड फोटोशूट प्रकरणात दिले हे स्पष्टीकरण

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग तसा कुठल्या ना कुठल्याप्रकारे नेहेमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी रणवीरचे काही फोटो वायरल झाले आणि संपूर्ण भारतात त्याची चर्चा रंगू लागली. पेपर मॅगझिनसाठी रणवीरच्या फोटोशूटमधील प्रतिमा २१ जुलै रोजी ऑनलाइन पोस्ट करण्यात आल्या होत्या. न्यूड फोटोशूटसाठी रणवीर सिंगला गेल्या महिन्यात मुंबईच्या चेंबूर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. जिथे अभिनेता दोन तास हजर होता. तिथे त्यांनी नोंद नोंदवण्यात आले. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, रणवीरने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, कोणीतरी त्याच्या एका फोटोशी छेडछाड केली आहे. ज्या पद्धतीने हे चित्रीकरण केले जात आहे, तसे चित्रीकरण झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी रणवीर सिंगचा जबाब नोंदवला आहे, आता ते त्याची पडताळणी करत आहे.

रणवीर सिंगने २२ जुलै रोजी त्याच्या न्यूड फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. रणवीरने एका मासिकासाठी हे फोटोशूट केले आहे. लोक अभिनेत्याचे फोटो शेअर करू लागले आणि हे फोटो व्हायरल होताच देशभरात अभिनेत्याच्या विरोधात निदर्शने झाली.

पोलिसांनी सांगितले की अभिनेत्याने त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्याच्या पहिल्या विधानाचे विश्लेषण केल्यानंतर पुढील चौकशीची गरज भासल्यास त्याला पुन्हा बोलावले जाऊ शकते. पोलिस अधिका-यांनी सांगितले की, अभिनेता तपासकर्त्यांसोबत “पूर्णपणे सहकार्य” करत होता.

हे ही वाचा:

भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम ‘गगनयान’ २०२४ मध्ये प्रक्षेपित होणार

सुकेश खंडणी प्रकरणी जॅक्लीन फर्नांडीसनंतर दिल्ली पोलिस करणार ‘या’ अभिनेत्रीची चौकशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version