Limca Book of Records मध्ये झाली सर्वात जास्त काळ चालणारी मालिका म्हणून ‘या’ मराठी मालिकेची नोंद…

रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), भार्गवी चिरमुले (Bhargavi Chiramule),प्रसाद ओक (Prasad Oak), कविता लाड (Kavita Lad), जयंत घाटे (Jayant Ghate),प्राजक्ता दिघे (Prajakta Dighe),अभिजीत केळकर (Abhijit Kelkar),मानसी नाईक (Mansi Naik),प्रिया मराठे यांसारख्या मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी या मालिकेत काम केलं.

Limca Book of Records मध्ये झाली सर्वात जास्त काळ चालणारी मालिका म्हणून ‘या’ मराठी मालिकेची नोंद…

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांना आपल्या वाटतात. तसेच मालिकेतील कलाकार चाहत्यांच्या मनात आपले घर निर्माण करतात. मराठीतील अनेक मालिका या प्रचंड लोकप्रिय आहे. विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. अनेक प्रेक्षक दररोज त्यांची आवडणारी मालिका न विसरता बघतात.तसेच आपल्या आवडत्या मालिकेच्या पुढच्या भागासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. चला तर मग मराठी मालिकांमध्ये सर्वाधिक काळ चाललेली मालिका कोणती? याबाबत जाणून घेऊयात.

चार दिवस सासूचे (Char Divas Sasuche) या मालिकेने काही वर्षांपूर्वी चाहत्यांचे मन जिंकले होते. अजूनही या मालिकेचे झालेले भाग परत परत बघण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेनं ३,१४७ एपिसोड पूर्ण केल्यानं या मालिकेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Limca Book of Records) ३००० पेक्षा जास्त एपिसोड चालणारी पहिली मालिका म्हणून नोंद झाली.

चार दिवस सासूचे ही मालिका ३ ऑगस्ट २०२० पासून छोट्या पड्यावर पुनःप्रसारित करण्यात आली होती. रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), भार्गवी चिरमुले (Bhargavi Chiramule),प्रसाद ओक (Prasad Oak), कविता लाड (Kavita Lad), जयंत घाटे (Jayant Ghate),प्राजक्ता दिघे (Prajakta Dighe),अभिजीत केळकर (Abhijit Kelkar),मानसी नाईक (Mansi Naik),प्रिया मराठे यांसारख्या मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी या मालिकेत काम केलं. देशमुख कुटुंबाची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती.

२०१२ मध्ये कविता लाड यांनी उंच माझा झोकामध्ये या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही कारणामुळे कविता लाड यांनी चार दिवस सासूचे ही मालिका सोडली.त्या या मालिकेत अनुराधा रवी देशमुख ही भूमिका साकारत होत्या. त्यानंतर अभिनेत्री लेखा तळवलकर (LekhaTalwalkar) यांनी या मालिकेत अनुराधा रवी देशमुख ही भूमिका साकारली. चार दिवस सासूचे या मालिकेच्या टायटल साँगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेची निर्मिती बाबुराव बोर्डे (Baburao Borde) आणि नरेश बोर्डे (Naresh Borde) यांनी केली होती. २६ नोव्हेंबर २००१ ते ५ जानेवारी २०१३ या कालावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

हे ही वाचा : 

ईडी, सीबीआयची भिती दाखवून पक्ष फोडणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीचा एकजुटीने मुकाबला करु, नाना पटोले

अमेरिकेतल्या Kauai island या बेटावर आहे शिवलिंग आणि एकमेव रूद्राक्षांचे वन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version