Sunday, June 30, 2024

Latest Posts

बिग बॉस मराठी 4चं होस्टिंग करणार ‘हा’ सुपरस्टार अभिनेता

कलर्स मराठी वरील प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉस सीजन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक सीझनची उत्सुकता चाहत्या वर्गाला असते तितकीच उत्सुकता बिग बॉसच्या चौथ्या सीझनची प्रेक्षकांना आहे. परंतु या सीझनचा होस्टिंग कोण करणार यासंदर्भात चर्चा होत होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम दिला आहे. बिग बॉस मराठी 4चे सूत्रसंचालक दुसरं तिसरं कोणी नाही तर महेश मांजरेकर करणार आहेत. कलर्स मराठी ने यासंदर्भात प्रोमो लॉन्च केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

यात महेश मांजरेकर यांनी म्हटले, “खेळाडू नवे, घर नवे, आणि होस्ट? वर्गात विद्यार्थी नवीन असताना. पण मास्टर तोच महेश वामन मांजरेकर. बिग बॉस मराठी च्या नव्या सीझनमध्ये मी घेणार आहे वेगळी शाळा बिग बॉस मराठी कलर्स टीव्हीवर लवकरच.” असे महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे. कलर्स मराठी नेहा प्रमोद लॉन्च करतात चहा त्या वर्गात ला आता या सीजन संदर्भात जास्त उत्सुकता लागून राहिली आहे.

प्रेक्षकांमध्ये चौथ्या सीझनचे होस्टिंग कोण करणार कुणी नवा चेहरा समोर येतोय का अशा चर्चा होत होत्या मागील तिनी सीजनमध्ये महेश मांजरेकर यांनी होस्टिंग केले मागील सीजन दरम्यान महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यामुळे चौथ्या सीझनमध्ये महेश मांजरेकर पोस्टिंग करणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात होती. दे धक्का चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका वाहिनीला मुलाखत देताना महेश मांजरेकर यांनी म्हटले की मी काही या बिग बॉस शो चा बांधील नाही माझे तीन वर्षाचा करार झाला होता आणि तीन वर्षे मी इमाने इतबाने काम केले आहे यानंतर सीजन फोर चा पोस्ट कोण असेल याची मला काही कल्पना नाही.” असे महेश मांजरेकर यांनी यावेळी म्हटले होते.

हेही वाचा : 

‘ती माझी प्रेमकथा’ लवकरच आपल्या भेटीला

Latest Posts

Don't Miss